CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्याचा रुग्णदर कमी, पण मृत्यूदर वाढला; कोरोनाचे ३८२० नवे रुग्ण, ६५ रुग्णांचा मृत्यू   

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 08:47 PM2021-04-28T20:47:43+5:302021-04-28T20:50:15+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कल्याण - डोंबिवलीत  १०९१ रुग्णांची वाढ झाली असून ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत ६३४ रुग्णांची वाढ झाली असून ८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

CoronaVirus Thane Updates death rate rises Corona 3820 new patients, 65 patients died in Thane | CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्याचा रुग्णदर कमी, पण मृत्यूदर वाढला; कोरोनाचे ३८२० नवे रुग्ण, ६५ रुग्णांचा मृत्यू   

CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्याचा रुग्णदर कमी, पण मृत्यूदर वाढला; कोरोनाचे ३८२० नवे रुग्ण, ६५ रुग्णांचा मृत्यू   

Next

ठाणे -  ठाणे जिल्ह्यात बुधवारी रुग्ण संख्येत थोडीशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. बुधवारी दिवसभरात ३८२० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ४ लाख ६० हजार ७५ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ६५ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ७ हजार ४६६ झाली आहे. 

ठाणे शहर परिसरात ९७१ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख १७ हजार ३७० झाली आहे. शहरात १५ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ६४७ झाली आहे. तर कल्याण - डोंबिवलीत  १०९१ रुग्णांची वाढ झाली असून ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत ६३४ रुग्णांची वाढ झाली असून ८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये १४० रुग्ण सापडले असून ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

भिवंडीत ३९ बाधीत असून शून्य मृत्यूची नोंद आहे. मीरा भाईंदरमध्ये ३७७ रुग्ण आढळले  तब्बल ९ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये १२५ रुग्ण आढळले असून ५ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. बदलापूरमध्ये १७८ रुग्णांची नोंद झाली असून १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये २६५ नवे रुग्ण वाढले आहेत. तर ५ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. आता बाधीत रुग्णसंख्या २६ हजार १०६ झाली असून आतापर्यंत ६८० मृत्यूंची नोंद आहे.
 

Web Title: CoronaVirus Thane Updates death rate rises Corona 3820 new patients, 65 patients died in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.