CoronaVirus मीरा भाईंदरमधील कोरोना रुग्णांची संख्या ६ वर पोहोचली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 07:50 PM2020-04-02T19:50:06+5:302020-04-02T19:50:45+5:30

९ संशयीत जोशी रुग्णालयात तर १३ जणांचे चाचणी अहवाल प्रलंबित

CoronaVirus patients in Meera Bhayandar reach 6 hrb | CoronaVirus मीरा भाईंदरमधील कोरोना रुग्णांची संख्या ६ वर पोहोचली

CoronaVirus मीरा भाईंदरमधील कोरोना रुग्णांची संख्या ६ वर पोहोचली

Next

मीरारोड - मीरा भार्इंदर महापालिकेने जारी केलेल्या आकडेवारी नुसार कोरोना रुग्णांची संख्या वाढुन ६ झालेली आहे. चाचणीचे तब्बल १३ अहवाल प्रलंबित असुन कोरोनाची लागण झालेल्या एकास भार्इंदरच्या भिमसेन जोशी रुग्णालयात, तीघांना कस्तुरबा रुग्णालयात तर दोघांना कोकीळाबेन रुग्णालयात दाखल केले आहे. शहरात कोरोनाची लागण वाढत असल्याने नागरिकांनी पालिका व शासनाच्या सुचनांचे काटेकोर पालन न केल्यास कोरोनाच संसर्ग वाढण्याची भिती निर्माण झालेली आहे.

महापालिकेने गुरुवार २ एप्रिल पर्यंचती कोरोनाची आकडेवारी देताना शहरात पडताळणी केलेल्या एकुण ७२० जणां मधील २० जण नव्याने आढळुन आलेले आहेत. यातील २७९ जणांनी १४ दिवसांचा अलगीकरणाचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. ४४१ जणांना अलगीकरण केले असुन त्या पैकी ३९७ जणं घरातच तर ३७ जणं महापालिकेच्या अलगीकरण केंद्रात पालिकेच्या देखरेखी खाली आहेत.

४४ जणांचे नमुने कोरोना चाचणी साठी पाठवले असता त्यातील २५ जणांचे अहवाल नेगेटिव्ह आलेले आहेत. तर १३ जणांचे अहवाल अजुन आलेले नाहित. चौघांना कोरोनाची लागण झालेली असुन मीरारोडच्या कानुगो इस्टेट भागातील एकाच कुटुंबातील ५ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. यातील तीघेजण कस्तुरबा रुग्णालयात, एक जण कोकीळाबेन रुग्णालयात तर भार्इंदरच्या भिमसेन जोशी रुग्णालयात दाखल आहे. तर नव्याने आणखी एक कोरोनाचा रुग्ण मीरारोडच्या मेडतिया भागातुन सापडला असुन त्याला कोकीळाबेन रुग्णालयात दाखल केले आहे.

महापालिकेचे जोशी रुग्णालय फक्त कोरोनाच्या उपचारासाठी राखीव केले असुन सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार १४ जणांचे चाचणी अहवाल नेगेटिव्ह आल्याने त्यांना सोडण्यात आले आहे. तर गुरुवारी ९ कोरोना संशयीत रुग्णालयात दाखल असुन त्यांचा अहवाल अजुन आलेला नाही.



 

Web Title: CoronaVirus patients in Meera Bhayandar reach 6 hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.