coronavirus: ठाणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या ४५ हजार पार , मंगळवारी १३४० बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 07:01 AM2020-07-08T07:01:31+5:302020-07-08T07:01:52+5:30

ठाणे जिल्ह्यात मंगळवारी नव्या एक हजार ३४० बाधितांसह ४५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४५ हजार २६६ तर मृतांचा आकडा एक ३५३ वर पोहचला आहे.

coronavirus: The number of patients in Thane district crossed 45,000, 1340 infected on Tuesday | coronavirus: ठाणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या ४५ हजार पार , मंगळवारी १३४० बाधित

coronavirus: ठाणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या ४५ हजार पार , मंगळवारी १३४० बाधित

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मंगळवारी नव्या एक हजार ३४० बाधितांसह ४५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४५ हजार २६६ तर मृतांचा आकडा एक ३५३ वर पोहचला आहे.
मंगळवारी कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात ३८१ रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या नऊ हजार ८८० तर मृतांची १५१ इतकी आहे. ठाणे पालिका हद्दीत २९६ बाधीतांसह १६ जणांचा मृत्यू झाला.यामुळे बाधितांची संख्या ११ हजार २९५ तर मृतांची ४३२ वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत ११५ रुग्णांसह आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. मीरा-भार्इंदरमध्ये १६१ रुग्णांसह चार जणांच्या मृत्य झाल्याने े बाधितांची संख्या चार हजार ६३३ तर, मृतांची १७२ झाली आहे. भिवंडी पालिकेत ३० बाधीतांमुळे संख्या दोन हजार ४३७ झाली. उल्हासनगरात ११९ रुग्णांसह एकाच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या तीन हजार ८८ तर मृतांची ५८ आहे. अंबरनाथमध्ये ५१ रुग्णांसह तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ३०३ तर मृतांची संख्या ७८ झाली. बदलापूरमध्ये ६२ रुग्ण सापडले असून बाधितांची संख्या एक हजार ७३ तर, मृतांची १८ झाली आहे.

नवी मुंबईत ८ हजारांचा टप्पा पूर्ण
नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहे. मंगळवारी ११५ नवीन रूग्ण आढळले असून एकूण रूग्ण संख्या ८,0७२ झाली आहे. दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईमध्ये आठ हजार रूग्णांचा टप्पा पूर्ण झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. शहरातील आठ पैकी पाच विभागात एक हजार पेक्षा जास्त रूग्ण झाले आहेत. सर्वाधिक १,४१६ रूग्ण कोपरखैरणे मध्ये आहेत. मृतांची संख्या २६0 झाली आहे. मंगळवारी १५९ रूग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ४,७४५ रूग्ण बरे झाले आहे.

वसई-विरारमध्ये १४६ नवीन रुग्ण; एकाचा मृत्यू
वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये मंगळवारी दिवसभरात १४६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण रुग्णांची संख्या ६५९९ झाली आहे. दरम्यान, मंगळवारी तब्बल ४०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आता कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३७०० झाली आहे. तर मृत्यू झालेल्यांची संख्या १३० झाली आहे, तर २,७६९ रुग्ण उपचार घेत आहेत.

रायगडमध्ये २३५ नव्या रु ग्णांची नोंद
अलिबाग : रायगड जिल्ह्यात मंगळवारी २३५ नव्या रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ५,८३४ वर पोहोचली आहे. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला.तर २५२ रु ग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. आतापर्यंत बाधित रु ग्णांपैकी ३३०४ रु ग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. १७१ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत २३५९ पॉझिटिव्ह रु ग्णांवर उपचार सुरु आहेत.

Web Title: coronavirus: The number of patients in Thane district crossed 45,000, 1340 infected on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.