CoronaVirus News : पालिकेच्या कळवा रुग्णालयातून दोन कोरोना रुग्णांचे पलायन, पोलिसांकडे तक्रार दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 06:10 PM2020-07-24T18:10:20+5:302020-07-24T18:11:24+5:30

त्यांची कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आल्याने इतर रुग्णालयात त्यांना हलविण्यात येणार होते. 

CoronaVirus News : Two corona patients escape from the municipal corporation's Kalwa hospital, complaint to police | CoronaVirus News : पालिकेच्या कळवा रुग्णालयातून दोन कोरोना रुग्णांचे पलायन, पोलिसांकडे तक्रार दाखल 

CoronaVirus News : पालिकेच्या कळवा रुग्णालयातून दोन कोरोना रुग्णांचे पलायन, पोलिसांकडे तक्रार दाखल 

googlenewsNext
ठळक मुद्दे मागील पाच दिवसापासून या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला रूग्ण हा भिवंडी येथे राहणार आहे. तर दुसरा रूग्ण नवी मुंबई मधील कोपरखैरणे येथे राहतो या दोघांना कोरोनाची लक्षणे असल्याने दाखल करण्यात आले होते.

ठाणे : कळवा रुग्णालयात कोरोना उपचार करीता दाखल असलेल्या दोन रुग्णांनी पलायन केल्याची घटना घडल्याने रुग्णालय प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. मागील पाच दिवसापासून या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला रूग्ण हा भिवंडी येथे राहणार आहे. तर दुसरा रूग्ण नवी मुंबई मधील कोपरखैरणे येथे राहतो या दोघांना कोरोनाची लक्षणे असल्याने दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आल्याने इतर रुग्णालयात त्यांना हलविण्यात येणार होते. 

 

त्याची तयारी सुरू असताना असवस्थ वाटत असल्याचा बहाणा करून भिवंडी येथील रुग्णाने पलायन केले. तर दुसरा रूग्ण संधी साधून रुग्णालयातून निसटला या बाबत रुग्णालय प्रशासनाने भिवंडी पोलिसांकडे तक्रार दाखल केला आहे. तसेच नवी मुंबई पोलिसांनी देखील कळवण्यात आले आहे कळवा रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. रुग्णालयातील सुमारे ५२ कर्मचारी वैदयकीय अधिकारी यांना कोरोनाची लागण झाली होती. येथे परिचारिका देखील कमी आहे रुग्णालयावर ताण पडला आहे त्यातून अश्या गोष्टी घडत असल्याचे रुग्णालयातील एका अधिकाऱयाने सांगितले. तर दोन रूग्ण पळून गेल्याच्या घटनेला रुग्णालयाच्या डीन यांनी देखील दुजोरा दिला आहे. या रुग्णालयात संशयित रुग्णांना दाखल केले जाते.त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना बाळकुम येथील एक हजार बेडचे रुग्णालय किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले जाते असे देखील रुग्णालय प्रशासनाने सांगितले. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

वकिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

 

...अन् फेसबुक फ्रेंडनं महिलेला घातला थोडा थोडका नव्हे, तर ११ लाखांचा गंडा

 

मनोरुग्ण तरुणीवर कारमध्ये अत्याचार; विवस्त्रवस्थेत आढळून आली पीडित तरुणी

 

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी

 

विकास दुबेला जामीन कसा मिळाला हा मुख्य मुद्दा; सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला फटकारलं

 

कोर्टाचा दणका! राजा मान सिंग फेक चकमकप्रकरणी ११ पोलिसांनी जन्मठेपेची शिक्षा 

 

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सोनू पंजाबनला कोर्टाने सुनावली २४ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

 

CoronaVirus News : सांगलीत उपनिरीक्षकासह सहा पोलिसांना कोरोनाची लागण

 

बस वाहकास मारहाण प्रकरणात रिक्षा चालकाला शिक्षा

 

बोटाला चावा घेऊन त्यानं पळ काढला; अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा प्रयत्न फसला

Web Title: CoronaVirus News : Two corona patients escape from the municipal corporation's Kalwa hospital, complaint to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.