CoronaVirus News : पालघरमध्ये दिवसभरात हजाराहून जास्त कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 12:04 AM2021-04-11T00:04:11+5:302021-04-11T00:04:35+5:30

CoronaVirus News : डहाणूत ५८, जव्हारमध्ये ९७, मोखाडामध्ये १९, पालघरमध्ये १७२, तलासरीत १६, विक्रमगडमध्ये १६, वाडामध्ये २८ तर वसई-विरारमध्ये ७०० रुग्ण आढळले.

CoronaVirus News: More than a thousand corona infections in Palghar every day | CoronaVirus News : पालघरमध्ये दिवसभरात हजाराहून जास्त कोरोनाबाधित

CoronaVirus News : पालघरमध्ये दिवसभरात हजाराहून जास्त कोरोनाबाधित

Next

पालघर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह वसई-विरार शहर महापालिका परिसरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाच्या शनिवारी सकाळच्या अहवालानुसार, जिल्ह्यात एकाच दिवसांत अकराशेपेक्षा जास्त बाधित रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक दिसून येत आहे.
माजी आरोग्यमंत्री डाॅ. दीपक सावंत यांनी जिल्ह्यातील कोरोनास्थितीचा आढावा घेतला. डहाणूत ५८, जव्हारमध्ये ९७, मोखाडामध्ये १९, पालघरमध्ये १७२, तलासरीत १६, विक्रमगडमध्ये १६, वाडामध्ये २८ तर वसई-विरारमध्ये ७०० रुग्ण आढळले. दरम्यान, जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असून तेथील आरोग्य व्यवस्था कमी पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. सावंत यांनी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांची तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांची भेट घेऊन चर्चा केली. रिव्हेरिया (देहर्जे-विक्रमगड) या हॉस्पिटललाही त्यांनी भेट दिली.
डॉ. सावंत यांनी दै. ‘लोकमत’ला सांगितले की, मधल्या काळात डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ यांना पेशंट कमी झाल्याने दूर केले गेले. त्यामुळे १७० बेड्स व आयसीयू हॉस्पिटल्सचा कारभार पाच-सहा डॉक्टर्स पाहत असून यात एकच एमडी फिजिशियन आहे. स्थानिक पॅरामेडिकल स्टाफ हा इतरत्र जास्त वेतन मिळते म्हणून गेला. बोईसर एमआयडीसीमध्ये एमआयडीसी, जिंदालसारख्या कंपन्यांना आवाहन करून सुविधा तयार करणे गरजेचे आहे.

आर्म फोर्स मेडिकलची मदत घ्या
ग्रामीण भागात दररोज सुमारे ३०० रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आर्म फोर्स मेडिकल कॉलेजची मदत घेऊन टेन्ट हॉस्पिटलची उभारणी केल्यास लष्कराच्या डॉक्टर्स व नर्सिंग स्टाफच्या सहाय्याने पूर्ण क्षमतेने ग्रामीण भागात सुविधा उभ्या करता येतील, अशी सूचना माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. शासकीय आरोग्य व्यवस्था कमी असल्याने कोविड निधी (जिल्हा नियोजन) यातील १६.५ टक्के दिला जातो, त्यापैकी ६ टक्के निधी खर्च करण्याचे अधिकार दिले जावेत, अशी सूचना त्यांनी केली आहे.

Web Title: CoronaVirus News: More than a thousand corona infections in Palghar every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.