CoronaVirus News: ठाण्यातील 'या' 22 ठिकाणी कधीही लागू शकतो लॉकडाऊन    

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 06:58 PM2020-06-28T18:58:50+5:302020-06-28T18:59:03+5:30

अनलॉकनंतर ठाणे शहरात कोरोना बाधितांचा आकडा हा कमालीचा वाढायला सुरवात झाली असून मृत्युदरही वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

CoronaVirus News: Lockdown may occur at any time in Thane | CoronaVirus News: ठाण्यातील 'या' 22 ठिकाणी कधीही लागू शकतो लॉकडाऊन    

CoronaVirus News: ठाण्यातील 'या' 22 ठिकाणी कधीही लागू शकतो लॉकडाऊन    

Next

ठाणे: संपूर्ण ठाणे शहरातच लॉकडाऊन करण्याचे संकेत देणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाने आता शहरातील २२ ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी मोठ्या  संख्येने कोरोना रुग्ण वाढले आहेत ,मात्र तरीही या परिसरातील नागरिकांकडून लॉकडाऊनचे पालन होत नसल्याचे  प्रशासनाच्या निदर्शनास आले असून अशी २२ ठिकाणे  प्रशासनाच्या  वतीने जाहीर करण्यात आली आहे.

पालिका  आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे .

अनलॉकनंतर ठाणे शहरात कोरोना बाधितांचा आकडा हा कमालीचा वाढायला सुरवात झाली असून मृत्युदरही वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता रुग्णसंख्या कमी करण्याचे मोठे आव्हान पालिका प्रशासना समोर आहे. ठाण्यात गेल्या तीन दिवसांपासून दररोज 300  पेक्षा अधिक रुग्ण सापडत असून यामुळे ठाणे शहराच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. शनिवारी  तर ठाणे शहरात कोरोना बाधितांचा आकड्याने तर उच्चांक गाठला असून 371 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर तब्बल 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. प्रामुख्याने  नौपाडा-कोपरी, वागळे, लोकमान्य सावरकर नगर , मुंब्रा आणि कळवा आशा ठिकाणी रुग्णासंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे,त्यामुळे पालिका प्रशासनाच्या वतीने शनिवारी आणि रविवारी बैठका घेण्यात आल्या असून शहरातील 22 ठिकाणी लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आला आहे .

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या माहिती नुसार गेल्या तीन महिन्यांपासून ठाणे शहरात ज्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत त्या ठिकाणी लॉकडाऊनची  अंमलबजावणी करण्यात नागरिकांचा म्हणावा तसा प्रशासनाला प्रतिसाद मिळत नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार लॉकडाउन करण्याच्या सूचना दिल्या असून काही ठिकाणी लॉकडाउन करण्याची अवश्यता असल्याचे देशमुख यांनी सांगितले. आता यावर प्रशासनाचे देखील एकमत झाले असून 22 ठिकाणी लवकरच कडक लॉकडाउनचा निर्णय कधीही होण्याची शक्यता असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू भरून ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन-

पालिका प्रशासनाच्या वतीने 22 ठिकाणी कोणत्याही क्षणी लॉकडाउन जाहिर होण्याची शक्यता असून या भागात राहणाऱ्या नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू भरून ठेवण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.प्रशासनाच्या या आवाहनामुळे या ठिकाणी आज किंवा मंगळवारी निर्णय जाहीर होण्याची शक्यता असून या ठिकाणी कडक अंमलबजावणी होणार आहे .

या ठिकाणी होणार कडक लॉकडाऊन-

  • बाळकुम
  • कोलशेत
  • ढोकाळी
  • मानपाडा
  • राम मारुती नगर
  • घोडबंदरचा काही भाग
  • कोपरी 
  • नौपाडा
  • वागळे
  • किसन नगर
  • पडवळ नगर
  • शांतीनगर
  • वारलीपाडा
  • कैलासनगर
  • रामनगर
  • इंदिरा नगर
  • सावरकर नगर
  • लोकमान्य नगर
  • कळवा 
  • मुंब्रा

Web Title: CoronaVirus News: Lockdown may occur at any time in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.