CoronaVirus News: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता लोकल धावली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 12:23 AM2020-06-16T00:23:51+5:302020-06-16T00:24:15+5:30

सर्वच स्थानकांवर पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद : अडीच महिन्यांनी प्रथमच सुटली डहाणूहून मुंबईसाठी गाडी, दळणवळण काही रुळांवर

CoronaVirus News: Local run for essential service personnel | CoronaVirus News: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता लोकल धावली

CoronaVirus News: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता लोकल धावली

googlenewsNext

पालघर/बोर्डी : लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर अडीच महिन्यांनी डहाणूहून मुंबईकडे जाणारी पहिली लोकल सकाळी ५ वाजता धावली तर डहाणू आगारानेही दिवसाला दोन एस.टी. गाड्यांची सुविधा प्रवाशांना उपलब्ध केली आहे. त्यामुळे डहाणू ते मुंबई दरम्यानचे दळणवळण काही अंशी पुन्हा रुळावर आले असले तरी पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद दिसला. दरम्यान, प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंग नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर दळणवळण व्यवस्था ठप्प झाली होती. त्यामध्ये लोकल सेवेचाही समावेश होता. नंतरच्या काळात लॉकडाऊन शिथिल केल्यावर गरजेनुसार काही प्रवासी साधनांना बंदीतून सूट देण्यात आली. मात्र लोकल सेवा सुरू झाली नव्हती. त्यासाठी जिल्ह्यातून मुंबईत अत्यावश्यक सेवा देणाºया नोकरदारांना स्वत:चे वाहन किंवा पालघर येथून सोडण्यात येणाºया एस.टी.चा आधार घ्यावा लागत होता.

दरम्यान, अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर सोमवार १५ जूनपासून पश्चिम रेल्वेने अत्यावश्यक सेवा बजावणाºया बारा विभागातील कर्मचाऱ्यांना लोकल सेवा उपलब्ध केली आहे. त्यानुसार डहाणू रोडहून मुंबईकडे जाणाºया आठ आणि मुंबईहून या स्थानकात येणाºया आठ अशा एकूण सोळा लोकल धावणार आहेत. त्याचे वेळापत्रक आणि या सेवेचा कोणाला लाभ घेता येणार आहे, त्यांना आवश्यक कागदपत्रे व नियमावलींची माहिती उपलब्ध केली आहे. डहाणूहून सोमवारी पहाटे ५ वाजता पहिली लोकल मुंबईच्या दिशेने धावली. त्यामध्ये केवळ एका प्रवाशाने प्रवास केला. ७.०५ वाजताच्या दुसºया लोकलमध्ये दोन प्रवासी, तर ९.३५ च्या तिसºया लोकलला पाच ते सहा प्रवाशी संख्या होती. या सर्व लोकल गाड्यांनी पूर्वीप्रमाणेच डहाणू रोड, वाणगाव, बोईसर, उमरोळी, पालघर, केळवे, सफाळे, वैतरणा आणि विरार या स्थानकात थांबा घेतला. परंतु कमी प्रवासी संख्येची परिस्थिती पालघर आणि अन्य स्थानकादरम्यान दिसून आली. अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी वसई, मुंबई आणि उपनगरात जाणाºया नोकरदारांनी खाजगी वाहने भाडेतत्त्वावर घेतल्याने लोकलमधील प्रवाशी संख्या कमी असून काही दिवसात ती वाढेल असे या कर्मचाºयांचे म्हणणे आहे.
दरम्यान, दुसºया टप्प्यात बँक, बांधकाम यासह अन्य क्षेत्रातील नोकरदारांना संधी देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

डोंबिवलीमधून सुटल्या ४०० ऐवजी २१० लालपरी
डोंबिवली : लोकल सेवा ही केवळ अत्यावश्यक सेवेतील सरकारी कर्मचाºयांकरिता असतानाही सोमवारी डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकातून २१० बसगाड्या सोडण्यात आल्या. मागील आठवड्यापर्यंत सुमारे ४०० च्या आसपास बसगाड्या सोडण्यात येत होत्या.
लोकल सुरूझाल्याचे निमित्त करून बस कमी केल्याचा सर्वाधिक फटका खासगी कंपन्यांमधील कर्मचाºयांना बसला. मंत्रालय, ठाणे, बदलापूर, सायन, जेजे मार्गावर या बस सोडल्या. काहींनी लोकल मिळेल, याची शाश्वती नसल्याने बसने जाणे पसंत केले.

Web Title: CoronaVirus News: Local run for essential service personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.