CoronaVirus News: 'ती' चूक तुम्ही करू नका, मोठी किंमत मोजावी लागेल; आव्हाडांचं जनतेला कळकळीचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 11:49 AM2020-05-11T11:49:48+5:302020-05-11T11:54:49+5:30

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपचार घेऊन घरी परतले

coronavirus marathi news dont repeat my mistakes says jitendra awhad says after recovery kkg | CoronaVirus News: 'ती' चूक तुम्ही करू नका, मोठी किंमत मोजावी लागेल; आव्हाडांचं जनतेला कळकळीचं आवाहन

CoronaVirus News: 'ती' चूक तुम्ही करू नका, मोठी किंमत मोजावी लागेल; आव्हाडांचं जनतेला कळकळीचं आवाहन

Next

ठाणे: राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना काल मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. २३ एप्रिलपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुढील काही दिवस आव्हाड डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच थांबतील. आव्हाड यांनीच ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

मी सुरुवातीला कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं. मात्र सुदैवानं मी यामधून वाचलो, असं आव्हाड म्हणाले. 'सुरुवातीला माझी चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे मी परिस्थिती गांभीर्यानं घेतली नाही,' असं आव्हाड यांनी सांगितलं. 'त्यानंतर मला ताप आला. माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्यानं ही लक्षणंदेखील दूर होतील, असं मला वाटलं. ती माझी चूक होती. त्याची मोठी किंमत मला मोजावी लागली,' असं आव्हाड म्हणाले.



लोकांनी कोरोनाच्या लक्षणांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं, लक्षणं दिसल्यास ती गांभीर्यानं घ्यावीत, असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलं. 'कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यास नागरिकांनी प्रशासनाला सतर्क करावं. तातडीनं डॉक्टरांकडे जावं. तुम्ही लक्षणांकडे दुर्लक्ष केलं, उपचारांना उशीर केला, तर त्याची जबर किंमत तुम्हाला मोजावी लागेल,' असं आव्हाड पुढे म्हणाले.



सुरुवातीला आव्हाड यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुंब्रा परिसरात अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम सुरू ठेवला. 'मला काहीही होणार नाही, असं मला वाटलं. मी लोकांमध्ये जाऊन जेवणाची पार्सल्स वाटत होतो. मी तसं करायला नको होतं,' असं आव्हाड म्हणाले. रुग्णालयातून घरी परतलेल्या आव्हाडांनी त्यांची काळजी घेणाऱ्या सर्वांचेच आभार मानले.

...म्हणून जवान मोठ्या संख्येनं सोडताहेत हवाई दल; सर्वेक्षणातून चिंताजनक माहिती समोर
 

गिलगिट-बाल्टिस्‍तानवर भारताच्या 'मास्‍टरस्‍ट्रोक'ला सिक्कीममधील संघर्षातून चिनी उत्तर, तज्ज्ञांचा दावा

ड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज

Web Title: coronavirus marathi news dont repeat my mistakes says jitendra awhad says after recovery kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.