coronavirus : कोरोना व्हायरसचे आर्थिक संकट २००५ नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 03:56 PM2020-03-24T15:56:19+5:302020-03-24T15:57:06+5:30

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झालेले आहेत. त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाला .

coronavirus: financial crisis of the corona virus hit government employees who join after 2005 | coronavirus : कोरोना व्हायरसचे आर्थिक संकट २००५ नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांवर

coronavirus : कोरोना व्हायरसचे आर्थिक संकट २००५ नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांवर

Next

ठाणे - सध्या जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसने सर्वसामान्यांचे जीवन धोक्यात आणले आहे.  सर्वत्र लॉग डाऊनची परिस्थिती असतानाच १ नोव्हें.२००५ नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे वास्तत ठाणे जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटनेचे अध्यक्ष विनोद लुटे यांनी स्पष्ट केले. 

ते म्हणतात की,  कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झालेले आहेत. त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाला .
गेल्या काही दिवसापासून शेअर बाजार सतत गडगडत असून गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे   आर्थिक नुकसान होत आहे. २००५ नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेल्या अंशदायी पेन्शन योजना(डिसीपीएस)/ नॅशनल पेंशन स्कीम (एनपीएस) शेअरबाजाराशी संबंधित आहे. त्याचा आर्थिक फटका या २००५ नंतरच्या शासकीय  कर्मचाऱ्यांनाही बसत आहे.

१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन योजना न लावता डीसीपीएस/ एनपीएस ही नवी अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे.या योजनेत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून १० टक्के रक्कम तर शासनाकडून १४ टक्के रक्कम कपात करून त्या कर्मचाऱ्यांच्या एनपीएस/डिसीपीएस खात्यामध्ये जमा केली जाते. जमा रकमेपैकी ३३.२४ टक्के एसबीआय पेन्शन फंड स्कीम मध्ये,३३.२४ टक्के रक्कम यूटीआय रिटायरमेंट सोल्यूशन पेंशन फंड स्कीम मध्ये तर उर्वरित३३.५२ रक्कम एलआयसी पेन्शन फंड स्कीममध्ये राज्य सरकारकडून गुंतवली जात असल्याचे लुटे यांच्या कडून सांगितले जात आहे. 

 कर्मचाऱ्यांची ही  रक्कम शेअर बाजाराशी संबंधित असल्याने यात सतत चढउतार पाहायला मिळत असतो. परंतु सध्याच्या कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असून त्याचा गंभीर परिणाम शेअर बाजारावरही झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले पंधरा दिवस शेअर बाजारात सतत घसरण होत असून सोमवारी (ता.२३) रोजी  सेन्सेक्स तब्बल १० टक्क्याने घसरून २९९१ अंकाने खाली घसरला याचा आर्थिक फटका २००५ नंतर च्या वर्ग तीन च्या कर्मचाऱ्यांना ३५ते४० हजार, वर्ग एकदोनच्या अधिकाऱ्यांचे किमान ६० हजार ते १ लाख रुपये नुकसान झाल्याचा अंदाज जुनी पेंशन हक्क संघटनेचे ठाणे जिल्हाअध्यक्ष विनोद लुटे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

कर्मचाऱ्यांचा वृद्धापकाळाचा आधार असलेल्या पेंशनची रक्कम शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासंदर्भात पुनर्विचार करण्याची भावना कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या अनुसरुन   "सरकारने कर्मचाऱ्यांचा पैसा बेभरवशाच्या शेअर बाजारात न गुंतवता वृद्धापकाळात आधार म्हणून १९८२ ची पेंशन योजना लागू करावी, अशी मागणी ही लुटे यांच्या कडून केली जात आहे.

Web Title: coronavirus: financial crisis of the corona virus hit government employees who join after 2005

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.