coronavirus: मुंब्य्रातून लखनऊला पळून जाण्याच्या प्रयत्नातील कोरोनाग्रस्त महिलेला घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 05:14 AM2020-07-09T05:14:33+5:302020-07-09T05:15:06+5:30

मुंब्य्रातील कौसा येथे एका रुग्णाचा २९ जून रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याची पत्नी आणि तीन मुले त्याच्या सोबतच वास्तव्याला होते. या चौघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला पालिका प्रशासनाने दिला होता

coronavirus: Coronavirus woman Catch while trying to flee from Mumbai to Lucknow | coronavirus: मुंब्य्रातून लखनऊला पळून जाण्याच्या प्रयत्नातील कोरोनाग्रस्त महिलेला घेतले ताब्यात

coronavirus: मुंब्य्रातून लखनऊला पळून जाण्याच्या प्रयत्नातील कोरोनाग्रस्त महिलेला घेतले ताब्यात

Next

ठाणे: कोरोनाग्रस्त महिलेने मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेण्याचा बहाणा करून मुंब्रा येथून थेट लखनऊ येथील आपल्या गावी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, कौसा येथील ठाणे महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्याने तीन मुलांसह मुंबई विमानतळावरून तिला नुकतेच ताब्यात घेतले आहे. या चौघांनाही आता मुंब्रा येथील विलगीकरण केंद्रात ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंब्य्रातील कौसा येथे एका रुग्णाचा २९ जून रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याची पत्नी आणि तीन मुले त्याच्या सोबतच वास्तव्याला होते. या चौघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला पालिका प्रशासनाने दिला होता. मात्र, मुंबईच्या सेव्हन हिल्स रु ग्णालयात उपचार घेऊ, असे सांगून ही महिला मुलांसह ३० जून रोजी मुंबईत गेली. रुग्णालयात दाखल न होता तिने लखनऊ येथे आपल्या गावी जाण्यासाठी विमानतळ गाठले. ती विमानतळावर पोहोचल्याची माहिती तिच्या मोबाइलमधील आरोग्य सेतू अ‍ॅपमुळे ठाणे आरोग्य विभागाला मिळाली. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मुंबई पोलिसांच्या मदतीने तिच्यासह तिच्या तिन्ही मुलांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना मुंब्रा येथील क्रीडा संकुलातील विलगीकरण कक्षात क्वारंटाइन केले. मुंब्रा येथील रु ग्णालयात मुलांना आणि आपल्याला वेगवेगळे ठेवले जाईल, त्यामुळे मुलांपासून विलग होण्याच्या भीतीने आपण गावी नातेवाइकांकडे जाऊन उपचार घेणार होतो, अशी माहिती तिने ठामपाच्या आरोग्य विभागाला दिली.

ही महिला कोरोनाग्रस्त असूनही ती उपचार घेण्याच्या नावाखाली मुंबईत गेली. मात्र, रुग्णालयात दाखल होण्याऐवजी तिने विमानतळ गाठल्याचे समजल्यानंतर तातडीने हालचाली करून मुंबई पोलिसांच्या मदतीने तिला मुलांसह ताब्यात घेतले.
- डॉ. हेमांगी घोडे, आरोग्य अधिकारी, कौसा

मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात ही महिला उपचारासाठी जाणार होती. तिकडे न गेल्यामुळे मुंबई पोलीस आणि ठाणे महापालिका प्रशासनाने तिला ताब्यात घेऊन आता विलगीकरण केंद्रात ठेवले आहे. तिच्यावर बेतलेली परिस्थिती लक्षात घेता या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.
- मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंब्रा

Web Title: coronavirus: Coronavirus woman Catch while trying to flee from Mumbai to Lucknow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.