Coronavirus : धक्कादायक! झोपडपट्ट्यांमधून कुठल्याही खबरदारीविना होतेय आरटी-पीसीआर टेस्टिंग स्वॅब किटचे पॅकिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 04:41 PM2021-05-05T16:41:05+5:302021-05-05T16:47:18+5:30

Coronavirus: काही झोपडपट्टीच्या घरात चक्क कोरोना महामारी काळात आरटीपीसीआर टेस्टिंग स्वैब स्किट कोणत्याही सुरक्षा विना पॅकिंग केली जात असल्याचे उघड झाले.

Coronavirus : Corona RT-PCR swab stick packing takes place in slum areas in Ulhasnagar | Coronavirus : धक्कादायक! झोपडपट्ट्यांमधून कुठल्याही खबरदारीविना होतेय आरटी-पीसीआर टेस्टिंग स्वॅब किटचे पॅकिंग

Coronavirus : धक्कादायक! झोपडपट्ट्यांमधून कुठल्याही खबरदारीविना होतेय आरटी-पीसीआर टेस्टिंग स्वॅब किटचे पॅकिंग

Next

- सदानंद नाईक 
उल्हासनगर -  खेमानी झोपडपट्टी भागात चक्क कोरोना आरटीपीसीआर टेस्टिंग स्वैब स्टिक बनविण्यात येत असल्याचे उघड झाले. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांनी पोलिसा समवेत परिसराची पाहणी करून अन्न औषध व प्रशासन विभागाला कारवाई करण्याचे संपर्क साधून सुचविले आहे. (Corona RT-PCR swab stick packing takes place in slum areas in Ulhasnagar)

उल्हासनगर कोणत्याही वस्तूची हुबेहूब वस्तू बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळेच शहराची यूएसए म्हणून देशात नव्हेतर जगात ओळख आहे. कॅम्प नं-३ परिसरातील खेमानी ज्ञानेश्वरनगर मधील काही झोपडपट्टीच्या घरात चक्क कोरोना महामारी काळात आरटीपीसीआर टेस्टिंग स्वैब स्किट कोणत्याही सुरक्षा विना पॅकिंग केली जात असल्याचे उघड झाले. अश्या आरटीपीसीआर टेस्टिंग स्वब स्किटच्या वापराने कोरोना चाचणी योग्य येणार का? असा प्रश्न केला जातो. दरम्यान याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर महापालिकेच्या अतिरिक आयुक्त करुणा जुईकर यांनी सदर प्रकारची दखल घेऊन बुधवारी दुपारी पोलिसा सोबत परिसराची पाहणी केली. तसेच येथे बनविण्यात येत असलेल्या आरटीपीसीआर कोरोना टेस्टिंग स्वब स्किटचा वापर आपल्या शहरात केला जात नसल्याची प्रतिक्रिया दिली. 

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांनी पोलिसा सोबत खेमानी ज्ञानेश्वरनगर परिसराची पाहणी केल्यानंतर, अन्न औषध व प्रशासन विभागाशी संपर्क साधून कारवाई करण्याची लेखी सूचना केली. झोपडपट्टी भागात कोणत्याही सुरक्षा विना कोरोना आरटीपीसीआर स्वब टेस्टिंग स्टिटची पैकिंग होतेच कशी?. असा प्रश्न निर्माण झाला असून याबाबतची माहिती अन्न औषध व प्रशासन विभागासह स्थानिक महापालिका प्रशासन व पोलीस विभागाला कशी नाही?. आदीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आरटीपीसीआर स्वब टेस्टिंग स्किटचा पैकिंग झोपडपट्टी विभागात करणाऱ्यांचा शोध घेऊन सक्त कारवाईची मागणी सर्वस्तरातून जात आहे. ऐन कोरोना महामारीच्या काळात नागरिकांच्या जीवितास खेळण्याचा सदर प्रकार आहे. महापालिकेच्या अतिरिक आयुक्त करुणा जुईकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसा सोबत घटनास्थळाची पाहणी करण्याचे धाडस करून अन्न औषध व प्रशासन विभागाला कारवाई करण्याचे सुचविले आहे. अश्या महिला अधिकाऱ्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. 

यादव यांच्यावर महिलांचा रोष
खेमानी ज्ञानेश्वरनगर मधील काही घरात आरटीपीसीआर कोरोना टेस्टिंग स्टिक कोणत्याही सुरक्षा विना बनवीत असल्याचा प्रकार एका यादव नामक इसमाने सुरवातीला उघड केला. त्या यादव नावाच्या इसमाचा घरावर कोरोना टेस्टिंग स्वब स्किट बनविणाऱ्या संतप्त महिलांनी घेराव घालून ऐन कोरोना काळात रोजगार हिरविल्याचा आरोप केला. त्यांना आरटीपीसीआर कोरोना टेस्टिंग स्किट बाबत काही एक माहिती नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाले.

Read in English

Web Title: Coronavirus : Corona RT-PCR swab stick packing takes place in slum areas in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.