Coronavirus : कच्चा माल येणे बंद, अंबरनाथ एमआयडीसीमधील रासायनिक कारखाने बंद होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 02:13 AM2020-03-20T02:13:00+5:302020-03-20T02:14:25+5:30

अंबरनाथ एमआयडीसी भागात तब्बल हजाराहून अधिक कारखाने आहेत. त्यातील अनेक कारखाने हे रासायनिक आहेत. रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना आवश्यक असलेला कच्चा माल हा चीनमधून मोठ्या प्रमाणात येतो.

Coronavirus : Chemical factories in Ambarnath MIDC are on the way to closing | Coronavirus : कच्चा माल येणे बंद, अंबरनाथ एमआयडीसीमधील रासायनिक कारखाने बंद होण्याच्या मार्गावर

Coronavirus : कच्चा माल येणे बंद, अंबरनाथ एमआयडीसीमधील रासायनिक कारखाने बंद होण्याच्या मार्गावर

Next

अंबरनाथ : अंबरनाथमधील औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखाने कच्च्या मालाअभावी बंद करण्याची वेळ आली आहे. तीन महिन्यांपासून कच्चा माल भारतात येत नसल्याने हे कारखाने बंद करावे लागत आहे. त्याचा सर्वाधिक फटका हा रासायनिक कारखान्यांना बसत आहे.

अंबरनाथ एमआयडीसी भागात तब्बल हजाराहून अधिक कारखाने आहेत. त्यातील अनेक कारखाने हे रासायनिक आहेत. रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना आवश्यक असलेला कच्चा माल हा चीनमधून मोठ्या प्रमाणात येतो. मात्र, तीन महिन्यांपासून कच्चा माल भारतात येत नसल्याने या कंपन्यांना प्रक्रिया करण्यासाठी साधनसामग्री कमी पडत आहे. त्यातच कच्चा माल येत नसल्याने हे कारखाने बंद करण्याची वेळ आली आहे. अशीच परिस्थिती इतर कारखान्यांच्या बाबतीतही घडत आहे. एमआयडीसी भागातील अनेक कारखाने हे परदेशातून येणाºया कच्च्या मालावर अवलंबून आहेत.

मात्र, कोरोनाच्या धोक्यामुळे सर्व व्यापार ठप्प झाल्याने त्याचा फटका औद्योगिक वसाहतीला बसला आहे. कंपनीमध्ये काम करण्यासाठी साधन नसल्याने कामगारांवर बसून राहण्याची वेळ येत आहे. तसेच तयार झालेला मालही परदेशात जात नसल्याने मोठ्या प्रमाणात तयार माल पडून आहे. गेल्या महिनाभरापासून औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनही मंदावले आहे. आता अनेक कारखान्यांना आपल्या कामगारांना सक्तीची सुटी देण्याची वेळ आली आहे.
अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष उमेश तायडे यांनीही या परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले आहे. अंबरनाथमधील अनेक कारखानदारांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम केवळ उत्पादनावरच नव्हे तर कामगारांच्या रोजगारावरही पडणार आहे.

रिक्षा राहणार बंद
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुकाने, रिक्षा उद्यापासून तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरूवारी पालिकेच्या सभागृहात बैठक झाली त्यात हा निर्णय झाला. रिक्षामधून संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आपत्कालीन परिस्थितीत पूर्व भागात पाच आणि पश्चिम भागात पाच रिक्षा सुरु ठेवण्यात येणार आहे.

Web Title: Coronavirus : Chemical factories in Ambarnath MIDC are on the way to closing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.