Coronavirus: ठाणे जिल्ह्यात सोमवार पासून ब्रेक द चेन, काय होणार सुरू आणि काय बंद, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 03:35 PM2021-06-06T15:35:44+5:302021-06-06T15:36:30+5:30

Break the chain in Thane District: ठाणे , नवीमुंबई दुसऱ्या  स्तरात तर कल्याण डोंबिवली, मिराभाईंदर, भिवंडी,उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुर, शहापुर आणि मुरबाड तिसऱ्या स्तरात

Coronavirus: Break the chain in Thane district from Monday, find out what will happen and what will stop | Coronavirus: ठाणे जिल्ह्यात सोमवार पासून ब्रेक द चेन, काय होणार सुरू आणि काय बंद, जाणून घ्या

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात सोमवार पासून ब्रेक द चेन, काय होणार सुरू आणि काय बंद, जाणून घ्या

googlenewsNext

ठाणे  -  राज्य शासनाने ज्या शहरांचा रुग्वाढीचा दर हा ५ टक्यांपेक्षा कमी असेल, तसेच ऑक्सीजन बेड २५ टक्यांपेक्षा कमी भरलेले असतील अशा शहरातील व्यवहार सोमवार पासून सुरळीत करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार ठाणो जिल्ह्यातही सोमवार पासून काही निर्बंध शिथील करण्यात आले येणार आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी राजेश नाव्रेवर यांनी जारी केले आहेत. ठाणो, नवीमुंबई या शहरांचा दुस:या स्तरात समावेश करण्यात आला आहे. तर उर्वरीत जिल्ह्यातील मिराभाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुर, शहापुर, मुरबाड या शहरांचा स्तर तिसरा ठेवण्यात आला आहे. त्यानुसार सोमवार पासून दुस:या स्तरातील र्निबध 5क् टक्के या प्रमाणो आणि तिसऱ्या  स्तरातील र्निबध हे काही अंशी शिथील होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दर आठवडय़ाला प्रत्येक शहरांचा रुग्णदरवाढीचा आणि ऑक्सीजन बेडचा आढावा घेऊन त्यानंतर र्निबध आणखी शिथील करण्यात येणार आहेत.

ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि ग्रामीण भागातील रुग्ण दरवाढीचा वेग काहीसा मंदावला आहे. राज्य शासनाने ज्या शहरांचा रुग्णवाढीचा दर हा ५ टक्यांपेक्षा कमी असेल तसेच ज्यांची ऑक्सीजन बेड हे २५ टक्के पेक्षा कमी भरलेले असतील अशांना पहिल्या टप्यात आणले आहे. परंतु रविवारी ठाणो जिल्हाधिकारी राजेश नाव्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बैठकीत प्रत्येक महापालिका, नगरपालिका आणि  ग्रामीण भागांचा पॉझीटीव्ही रेट आणि ऑक्सीजन बेडचा सारासार विचार करुन ठाणे  आणि नवीमुंबई वगळता जिल्ह्यातील इतर शहरांचा आणि ग्रामीण भागांचा फेज ३ मध्ये समावेश करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

त्यानुसार ठाणे  शहर आणि नवीमुंबईचा दुसऱ्या  स्तरात समावेश करण्यात आला आहे. तर मिराभाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुर, शहापुर, मुरबाड या शहरांच तिसऱ्या  स्तरात समावेश करण्यात आला आहे. स्तर ३ मधील रुग्णवाढ हि ८.३२ टक्के आणि ऑक्सिजन बेड २३.८८ टक्के एवढे आहेत. त्यानुसार आता  ठाणे  आणि नवीमुंबईतील व्यवहार बऱ्यापैकी  प्रमाणे  सुरळीत होणार आहेत. तर जिल्ह्यातील भागांचे व्यवहार काही अंशी सुरळीत होणार आहे. त्यानुसार आता टप्याटप्याने ब्रेक दे चेन ठाणे  जिल्ह्यात सुरु झाले आहे. व्यावसायिक , ग्राहक जनतेच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कोरोना नियमांचे पालन करणो गरजेचे असून त्यांनी नियम पाळले तर ब्रेक द चेन होईल परंतु नियम पाळले नाही तर मात्र पुन्हा कडक र्निबध लावले जातील असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

ठाणे  आणि नवीमुंबई ( स्तर -२ )
काय सुरु राहील

५० टक्के क्षमतेने हॉटेल सुरु राहणार, मॉल चित्रपटगृह - ५० टक्के, दुकाने पुर्ववत, लोकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेकरीता, सार्वजनिक ठिकाणे , मैदाने, सर्व खाजगी कार्यालये, शासकीय कार्यालये, विविध खेळांसाठी सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ अशा वेळेत सुरु राहतील, चित्रिकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थिती मर्यादा, अंत्यविधीसाठी बंधन नसेल, जीम, सलुन, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर ५० टक्के क्षमतेने परवानगी, लग्न सोहळ्यासाठी १०० जणांच्या उपस्थितीत परवानगी, सार्वजनिक वाहतुक १०० टक्के क्षमतेने सुरु
 काय बंद राहील
धार्मिक स्थळे, लोकल प्रवास बंद राहणार आहे.

कल्याण - डोंबिवली, मिराभाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुर, शहापुर आणि मुरबाड (स्तर -  ३)
काय काय सुरु राहणार

अत्यावश्यक दुकाने सांयकाळी ४ वाजेर्पयत सुरु राहणार, इतर आस्थापना या सोमवार ते शुक्रवार या दिवसात ४ वाजेर्पयत सुरु राहणार, रेस्टॉरेन्ट, हॉटेल ५० टक्के क्षमतेने ४ वाजेर्पयत सुरु , सार्वजनिक ठिकाणे , मैदाने, चालणे , सायकलींग सकाळी ५ ते ९ वाजेर्पयत तसेच सांयकाळी ६ ते ९ वाजेर्पयत केवळ मैदानी खेळांना परवानगी असेल, खाजगी आणि शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरु, चित्रिकरण ४ वाजेर्पयत, सामाजिक मेळावे, सांस्कृतिक, करमणुक ५० टक्के क्षमतेने ४ वाजेर्पयत, लग्न समारंभ ५० लोकांच्या उपस्थितीत, बांधकामाकरीता ऑनसाईट मजुर असतील त्याठिकाणी सांयकाळी ४ वाजेर्पयत, ऑनलाईन शॉपींग नियमितपणो सुरु राहणार, सार्वजनिक परिवहन सेवा १०० टक्के क्षमतेने, मालवाहतुक जास्तीत ३ व्यक्तींसह, खाजगी कार, लांब पल्याला जात असतील इ पास बंधनकारक असणार, लोकल सेवा केवळ अत्यावश्यकसेवेसाठीच, अंत्यविधीसाठी २० लोकांची उपस्थिती.

काय बंद राहणार
सांयकाळी ४ नंतर चित्रिकरण, हॉटेल, रेस्टॉरेन्ट, सामाजिक मेळावे, सांस्कृतिक करमणुक  बंद राहणार,लोकल सेवा बंद, अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद, मॉल्स, शॉपींग सेंटर बंद, जमावबंदी, संचारबंदी कायम राहील.

Web Title: Coronavirus: Break the chain in Thane district from Monday, find out what will happen and what will stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे