CoronaVirus : कोरोनामुळे दहशत आम्ही माणसे नाहीत का? बँक कर्मचाऱ्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 01:15 AM2020-03-28T01:15:05+5:302020-03-28T01:15:37+5:30

Coronavirus: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. बँका मात्र सुरूच आहेत. आर्थिक व्यवहाराच्या दृष्टिकोनातून बँका सुरू ठेवणे क्रमप्राप्त आहे.

CoronaVirus: Are we not human beings terrorized by Corona? The issue of bank employees | CoronaVirus : कोरोनामुळे दहशत आम्ही माणसे नाहीत का? बँक कर्मचाऱ्यांचा सवाल

CoronaVirus : कोरोनामुळे दहशत आम्ही माणसे नाहीत का? बँक कर्मचाऱ्यांचा सवाल

Next

ठाणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आता बँक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आला आहे. आता सर्वच व्यवहार आॅनलाइन झालेले आहेत. अत्यावश्यक सेवेत कुठेही बँक कर्मचाºयांचा समावेश करण्यात आलेला नाही. याशिवाय संचारबंदीमुळे बँकांकडे ग्राहक फिरकतही नाहीत. त्यामुळे बँकाच्या मुख्य शाखावगळता इतर शाखा बंद करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अनेक बँकांकडून करण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. बँका मात्र सुरूच आहेत. आर्थिक व्यवहाराच्या दृष्टिकोनातून बँका सुरू ठेवणे क्रमप्राप्त आहे. मात्र २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाउन झाल्यानंतर आता बँका तरी का सुरूठेवायच्या, असा सवाल बँक कर्मचाºयांमधून उपस्थित होत आहे. अत्यावश्यक सेवा देणाºया सर्वांचेच कौतुक झाले. मात्र बँक कर्मचाºयांचा साधा उल्लेख कोणत्याही नेत्याने अथवा मंत्र्यांने केलेला नाही. असे असले तरी आजही बँका सुरूआहेत. परंतु संचारबंदी लागू झाल्याने बँकेत ग्राहक येताना दिसत नाही. ग्राहकांची संख्या पूर्णत: रोडावली आहे. बँकेत काम करणारे अनेक कर्मचारी लांबून येतात. मात्र रेल्वे सेवा बंद असल्याने अनेक कर्मचाºयांना कामावर येणे शक्य होत नाही. परंतु आता कामावर न गेल्यामुळे आमचा पगार तर कापला जाणार नाही ना, अशी शंकाही अनेक कर्मचाºयांच्या मनात येत आहे. आम्ही पण माणसे आहोत, आमचाही कुठेतरी विचार व्हावा, अशी मागणी कर्मचाºयांकडून केली जात आहे. त्यातही आता अर्थमंत्र्यांनी पुढील तीन महिने बँकेचे हप्तेदेखील घेऊ नका, असे सांगितले आहे. त्यामुळे बँकेत ग्राहक येतील असे कुठेही दिसत नाही. दुसरीकडे संचारबंदी असल्याने पोलीस रस्त्यावर येणाºया प्रत्येकाला मार देत आहेत. काही दिवसांपूर्वी परभणीमध्ये एका बँकेत परदेशातून आलेली एक व्यक्ती पासबुकची एन्ट्री करायला गेली होती. ती कोरोना पॉझिटिव्ह होती. त्यामुळे बँकेतील इतर कर्मचाºयांचीदेखील तपासणी करण्यात आली. त्यानंतर ही बँक १० दिवस बंद ठेवण्यात आली होती.
आधुनिक युगात बहुतांश व्यवहार हे आॅनलाइन पद्धतीने होत आहेत. त्यामुळे अशा भीषण परिस्थितीत बँक सुरू असणे अपेक्षित नाही. त्यामुळे सुरक्षेच्या मुद्द्यावर आमच्या मागणीचा विचार व्हावा, अशी मागणी बँक कर्मचाºयांनी केली आहे. बँक बंद ठेवण्याची मागणी जरी आमची असली तरी एटीएममध्ये पैसे पुरविण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारण्यास तयार आहोत. आठवड्यातील दोन दिवस त्या पद्धतीचे नियोजन करण्याची तयारीदेखील अनेक कर्मचाºयांनी दाखविली आहे. आपल्या मागणीचा सहानुभुतीपूर्वक विचार करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

यासंदर्भात मी अर्थमंत्र्यांशी मेलद्वारे पत्रव्यवहार केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेही पत्रव्यवहार केला आहे. मात्र अद्यापही त्यावर योग्य ती कार्यवाही झालेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँक कर्मचाºयांनाही या आजाराचा धोका आहे. त्यामुळे आमच्या मागणीचग विचार व्हावा, हीच इच्छा आहे.
- राजेश मतकरी,
युनियन बँकेचे पदाधिकारी

Web Title: CoronaVirus: Are we not human beings terrorized by Corona? The issue of bank employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.