धक्कादायक! ठाण्यातील वृद्धाश्रमातील ६७ जणांना कोरोनाची लागण, रुग्णालयात उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 04:40 PM2021-11-28T16:40:46+5:302021-11-28T16:41:21+5:30

Coronavirus in Thane : विशेष म्हणजे या सर्वांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणही झाले आहे. त्या वृद्धाश्रमातील एका कर्मचाऱ्याच्या मुलीला ताप आल्यानंतर त्या कर्मचाऱ्यालाही तापाची कणकण जाणवली. त्यानंतर कोरोनाचा पसार झाल्याचे सांगण्यात येते. 

Coronavirus : 67 people from Khadwali old age home in Thane infected with corona and undergoing treatment at hospital | धक्कादायक! ठाण्यातील वृद्धाश्रमातील ६७ जणांना कोरोनाची लागण, रुग्णालयात उपचार सुरू

धक्कादायक! ठाण्यातील वृद्धाश्रमातील ६७ जणांना कोरोनाची लागण, रुग्णालयात उपचार सुरू

Next

ठाणे : खडवली वृद्धाश्रमातील ६७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. विशेष म्हणजे या सर्वांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणही झाले आहे. त्या वृद्धाश्रमातील एका कर्मचाऱ्याच्या मुलीला ताप आल्यानंतर त्या कर्मचाऱ्यालाही तापाची कणकण जाणवली. त्यानंतर कोरोनाचा पसार झाल्याचे सांगण्यात येते. 

एकीकडे रुग्ण संख्या कमी होत असताना, एकाच वेळी ६७ जणांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये एका लहान मुलासह ३९ पुरुष तर एका लहान मुलीसह २८ महिलांचा समावेश आहे. एकीकडे जिल्हा रुग्णालयात अवघ्या चार ते पाच रुग्णांवर उपचार सुरु असतांना येथील कर्मचारी वर्ग काहीसे निवांत होण्याच्या मार्गावर होते. दरम्यान, खडीवलीतून हे रुग्ण आणण्यात येणार असल्याची माहिती कळताच रुग्णालय प्रशासनाची चांगली धावपळ उडाली.

शनिवारी सायंकाळी ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी खडवली येथील वृद्धाश्रमातील ६७ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करायचे असल्याची माहिती त्यांनी ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांना दिली. त्यानुसार डॉ. पवार यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टिमने हे रुग्ण दाखल करण्यासाठीची तयारी केली. 

कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने रुग्णालयातही मोजकेच रुग्ण आहेत. त्यामुळे स्टाफही कमी होता. मात्र, या रुग्णांना आणण्यापूर्वीच तातडीने वॉर्ड ही सज्ज ठेवून डॉक्टर-नर्स तसेच इतर कर्मचारी वर्गास तात्काळ पाचारण केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

Web Title: Coronavirus : 67 people from Khadwali old age home in Thane infected with corona and undergoing treatment at hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.