coronavirus: ठाणे जिल्ह्यात रविवारी सापडले १८७६ नवे रुग्ण; ४७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 06:18 AM2020-07-06T06:18:04+5:302020-07-06T06:18:41+5:30

शनिवारप्रमाणे रविवारीही कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ४८२ रु ग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या नऊ हजार ८६ तर मृतांची १४० इतकी झाली.

coronavirus: 1876 new patients found in Thane district on Sunday; 47 Death | coronavirus: ठाणे जिल्ह्यात रविवारी सापडले १८७६ नवे रुग्ण; ४७ जणांचा मृत्यू

coronavirus: ठाणे जिल्ह्यात रविवारी सापडले १८७६ नवे रुग्ण; ४७ जणांचा मृत्यू

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात रविवारी दिवसभरात बाधितांची संख्या एक हजार ८७६ तर ४७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४२ हजार ६१८ तर मृतांची एक हजार २५२ झाली आहे.
शनिवारप्रमाणे रविवारीही कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ४८२ रु ग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या नऊ हजार ८६ तर मृतांची १४० इतकी झाली. ठाणे महापालिका हद्दीत ३७३ बाधितांसह १६ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या १० हजार ७३१ तर मृतांची ४०२ वर गेली आहे. मीरा भार्इंदरमध्ये ३०३ रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या चार हजार ३१४ तर मृतांची संख्या १६२ इतकी झाली आहे.
भिवंडी महापालिका क्षेत्रात ६९ बाधीतांसह एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांची संख्या दोन हजार ३१९ वर तर मृतांची संख्या १२0 वर पोहोचली. उल्हासनगर २५१ रु ग्णांसह एकाच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ८१० तर मृतांची ५३ झाली आहे.

नवी मुंबईत मृतांचा आकडा अडीचशेच्या घरात

नवी मुंबई: शहरात कोरोना रूग्णांच्या वाढीचा आलेख खाली येताना दिसत नाही. विशेषत: मृतांचे वाढते प्रमाण चिंताजनक बनले आहे. नवी मुंबईत आतापर्यंत २४४ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महापालिकेसमोर मृतांचा दर कमी करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. नवी मुंबईत आतापर्यंत ७,७९३ कोरोनाबाधीतांची नोंद झाली आहे. यापैकी ४,४३३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर ३,११६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी १९१ नवीन रूग्णांची भर पडली आहे. तर १६७ रूग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. कोपरखैरणे विभागातून सर्वाधिक म्हणजेच तब्बल ५६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. त्यापाठोपाठ नेरूळ विभागात बरे झालेल्या रूग्णांची संख्या ३१ इतकी आहे.

वसई-विरारमध्ये सहा हजारांचा टप्पा पार
वसई : वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये रविवारी दिवसभरात २११ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने सहा हजारांचा टप्पा पार झाला असून एकूण रुग्णांची संख्या ६१७० झाली आहे. दरम्यान, १४२ जणांनी या जीवघेण्या आजारावर दिवसभरात मात केली आहे.
वसई-विरारमध्ये रविवारी आढळलेल्या २११ रुग्णांमुळे सहा हजारचा टप्पा पार झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. मात्र त्याच वेळी दिवसभरात १४२ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २८१० झाली आहे, ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब ठरली.

रायगडमध्ये दिवसभरात २६२ कोरोनाबाधित
अलिबाग : जिल्ह्यात रविवारी ५ जुलै रोजी २६२ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या ५१८१ वर पोहोचली आहे. त्यापैकी २९०५ रु ग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
रविवारी दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १४५, पनवेल ग्रामीणमध्ये ३९, उरण २३, अलिबाग ६, कूूर्जत ६, पेण ९, महाड २, खालापूर १०, माणगाव ४, रोहा १०, श्रीवर्धन ७, सुधागड १ असे एकूण २६२ कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण आढळून आले. दिवसभरात पनवेल मनपा ४८, पनवेल ग्रामीण ३९, खालापूर ३, कर्जत १६, पेण १३, अलिबाग १०, माणगाव २ असे १३१ रु ग्ण उपचारानंतर बरे झाले.

Web Title: coronavirus: 1876 new patients found in Thane district on Sunday; 47 Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.