coronavirus: मीरा भाईंदरमधील 12 कोरोना हॉटस्पॉटमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 01:59 PM2020-08-01T13:59:15+5:302020-08-01T13:59:22+5:30

शहरात सम आणि विषम तारखां प्रमाणेच दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश कायम ठेवतानाच दुकानांची वेळ सायंकाळी 5 वरून सायंकाळी 7 वाजे पर्यंत केली आहे . 

coronavirus: 12 corona hotspots in Mira Bhayandar locked down till August 31 | coronavirus: मीरा भाईंदरमधील 12 कोरोना हॉटस्पॉटमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन

coronavirus: मीरा भाईंदरमधील 12 कोरोना हॉटस्पॉटमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन

Next

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांनी शहरातील कोरोनाच्या 12 हॉटस्पॉट मध्ये 31 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवले आहे . तर शहरात सम आणि विषम तारखां प्रमाणेच दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश कायम ठेवतानाच दुकानांची वेळ सायंकाळी 5 वरून सायंकाळी 7 वाजे पर्यंत केली आहे . 

आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी ३१ जुलै रोजी सायंकाळी जारी केलेल्या आदेशा नुसार मीरा भाईंदर मध्ये कोरोनाचे 12 हॉटस्पॉट जाहीर केले आहेत . त्यात भाईंदरचे क्रॉस गार्डन , लोपेरा स्ट्रीट , व्यंकटेश शांती , नवघर गणेश गल्ली परिसराचा समावेश आहे . तर मीरारोड मधील नित्यानंद नगर , विजयपार्क , कल्पतरू , वरचा आणि खालचा पेणकरपाडा , रॉयल शालीभद्र , सृष्टी सेक्टर 1 ते 3 हे हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहेत . या सर्व हॉटस्पॉट मध्ये 31 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत . 

हॉटस्पॉट क्षेत्र वगळता राज्य शासनाच्या मिशन बिगिन अगेन च्या धोरण नुसार आस्थापना - व्यवसाय सुरु राहतील . मॉल , मार्केट , कॉम्प्लेक्स , जिम व स्विमिंग पूल बंदच राहतील . तर शहरातील दुकाने , भाजी मार्केट , बाजारपेठ देखील सम आणि विषम पद्धतीनेच सुरु राहतील .दुकाने उघडी ठेवण्याची वेळ सकाळी 9 ते 5 ऐवजी आता दोन तासांनी वाढवून सायंकाळी 7 वाजे पर्यंत करण्यात आली आहे . विशेष म्हणजे आयुक्तांनी हे संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी ठरवतील असे देखील नमूद केले आहे . 

Web Title: coronavirus: 12 corona hotspots in Mira Bhayandar locked down till August 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.