कोरोना योध्दयांची पालिकेच्या भरतीमधून माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 04:06 PM2020-05-27T16:06:14+5:302020-05-27T16:07:34+5:30

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून १५ विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार पहिल्याच दिवशी या भरतीकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे एमडी आणि एमबीबीएस डॉक्टरांनीही याकडे कानाडोळा केल्याचे दिसत होते.

Corona warriors withdraw from municipal recruitment | कोरोना योध्दयांची पालिकेच्या भरतीमधून माघार

कोरोना योध्दयांची पालिकेच्या भरतीमधून माघार

Next

ठाणे : ठाणे महाापलिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रु ग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेकडील मनुष्यबळही कमी पडत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने आता कंत्राटी स्वरुपात कोरोनाचा सामना करण्यासाठी कंत्राटी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार मंगळवार पासून महापालिका मुख्यालयाबाहेर सोशल डिस्टेसिंगचे पालन करीत उमेदवारांनी थेट मुलाखतींसाठी हजेरी लावली होती. परंतु या भरती प्रक्रियेकडे कोरोना योध्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे. या भरती प्रक्रियेतून जवळ जवळ १५०० जण भरती केले जाणार आहेत. परंतु कोरोनाची भिती असल्याने अनेक डॉक्टर, नर्सेस आमि अन्य कर्मचाऱ्यांनी देखील याकडे पाठ फिरविल्याचेच दिसून आले आहे.
कोरोनाची वाढती संख्या नजरेसमोर ठेवून महापालिकेच्या माध्यमातून कंत्राटी स्वरुपात भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामध्ये डॉक्टर, नर्सेस, आया, वॉर्ड बॉय अशी १५ प्रकारची पदे भरली जात आहेत. त्याची प्रक्रिया मंगळवार पासून सुरु करण्यात आली आहे. थेट मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जात आहे. मंगळवारच्या दिवसावर नजर टाकल्यास हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच उमेदवारांनी हजेरी लावल्याचे दिसून आले. या भरती प्रक्रियेला पहिल्यांदा म्हणावा तितका प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातही एमडी डॉक्टर आणि एमबीबीएस डॉक्टरांनीही या भरती प्रक्रियेकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले.
महापालिकेच्या माध्यमातून लेक्चरर, ज्यु. रेसिडेंट, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुर्वेद आदींसाठी ५०० जणांची भरती केली जाणार आहे. परंतु मंगळवारी या पदांसाठी काही आयुर्वेदिक आणि होमियोपॅथी आदींसाठी बहुसंख्य डॉक्टरांनी हजेरी लावली होती. परंतु इतर पदांसाठी उमेदवारांनी पुढाकार घेतला नसल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाने एमबीबीएस आणि एमडी डॉक्टरांसाठी दो लाख ४० हजार रु पयांचे मासिक मानधन देणार आहे. शिवाय त्यांना ५० लाखांच्या विम्याचे कवचही मिळणार आहे. परंतु आयुर्वेदिक आणि होमियोपॅथी डॉक्टरांशिवाय इतर कोणीही हजेरी लावलेली नसल्याचे दिसून आले.
नर्सेस पदांसाठीही अपेक्षेपेक्षा कमी हजेरी
नर्सेस (परिचारिका) १९५ जणांची भरती केली जाणार होती. परंतु मंगळवारी मुलाखतीसाठी केवळ ६५ उमेदवारांनी हजेरी लावली. तर प्रसाविकांची ११० पदे भरली जाणार होती. त्यासाठी ७७ उमेदवारांनी हजेरी लावली

 

अन्य पदे ३० मे पर्यंत भरली जाणार
बुधवार को सिस्टर इंचार्ज, प्रयोगशाळा विशेषज्ञ, औषध निर्माण अधिकारी आदींच्या मुलाखती घेतल्या गेल्या. तर गुरुवारी वॉर्ड बॉयसाठी मुलखती घेतल्या जाणार आहेत. तसेच आरोग्य निरीक्षक, सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटाएंट्री आॅपरेटर साठी २९ मे आणि ईसीजी आॅपरेटर, आया पदासाठी ३० मे रोजी मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

 

कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन काम करणे गरजेचे आहे. जितक्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कमी उमेदवार येणे ही चिंतेची बाब आहे. मात्र मी या माध्यमातून आवाहन करीत आहे की जास्तीत जास्त उमेदवारांनी हजेरी लावून या प्रक्रियेस सहकार्य करावे.
विजय सिंघल (आयुक्त - ठाणे मनपा)


 

Web Title: Corona warriors withdraw from municipal recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.