ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दोन लाखांच्या वर, २४ तासांत २५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 10:07 AM2020-10-19T10:07:54+5:302020-10-19T10:10:21+5:30

ठाणे शहरात २६६ नवे रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात ४३ हजार ५७१ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय, पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार १०४ झाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात २९३ रुग्ण नव्याने आढळले असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

Corona over two million patients | ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दोन लाखांच्या वर, २४ तासांत २५ जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दोन लाखांच्या वर, २४ तासांत २५ जणांचा मृत्यू

googlenewsNext


ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी दोन लाख ४७० चा आकडा आजपर्यंत गाठला आहे. यात रविवारी सापडलेल्या एक हजार ८३ रुग्णांचा समावेश आहे. २४ तासांत २५ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या पाच हजार ७० झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली. 

ठाणे शहरात २६६ नवे रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात ४३ हजार ५७१ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय, पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार १०४ झाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात २९३ रुग्ण नव्याने आढळले असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता ४७ हजार ८८८ रुग्ण बाधित असून आजपर्यंत ९५५ मृत्यू झाले आहेत. उल्हासनगरला रविवारी २९ नवे रुग्ण आढळले आणि एकाचा मृत्यू झाला आहे. शहरात नऊ हजार ८५५ रुग्ण बाधित असून मृतांची संख्या ३२४ झाली आहे.

भिवंडी मनपा परिसरात ३६ रुग्ण नव्याने सापडले आहेत. आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. येथे पाच हजार ६६९ बाधितांची, तर ३२८ मृतांची नोंद झाली आहे. मीरा-भाईंदर  शहरात ७९ नवे रुग्ण आणि चार मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. या शहरात आता २१ हजार २९१ बाधितांसह ६७१ मृतांची नोंद झाली आहे. अंबरनाथ शहरात २६ रुग्णांचा नव्याने शोध लागला आहे. आज एकही मृत्यू झाला नाही. या शहरात आता सहा हजार ९९४ बाधितांसह २५८ मृतांची संख्या नोंदवण्यात आली आहे. 

बदलापूर परिसरामध्ये ४६ रुग्ण आज सापडले आहेत. त्यामुळे बाधित रुग्ण सहा हजार ९५६ झाले आहेत. आज एकही मृत्यू झालेला नसल्यामुळे मृत्यूची संख्या ९३ कायम आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या गावपाड्यांमध्ये ६९ रुग्णांचा आज शोध लागला आहे. दोन मृत्यू झाले आहेत. या गावपाड्यांत आतापर्यंत १६ हजार ३४ बाधित झाले असून ४८७ जणांचा मृत्यू झालेला आहे.
 

Web Title: Corona over two million patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.