वरसावे नाका परिसरातील हॉटेल कर्मचाऱ्यांच्या पालिकेकडून कोरोना तपासण्या; ६ कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 07:05 PM2021-02-21T19:05:49+5:302021-02-21T19:06:07+5:30

मुंबई अहमदाबाद महामार्ग व घोडबंदर महामार्गाच्या वरसावे नाक्यावर असलेल्या एका हॉटेल मध्ये २१ कोरोना रुग्ण सापडल्या नंतर आता महापालिका खडबडून जागी झाली

Corona inspections by the Hotel Staff Corporation in the Varsave Naka area; 6 employees found positive | वरसावे नाका परिसरातील हॉटेल कर्मचाऱ्यांच्या पालिकेकडून कोरोना तपासण्या; ६ कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह 

वरसावे नाका परिसरातील हॉटेल कर्मचाऱ्यांच्या पालिकेकडून कोरोना तपासण्या; ६ कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह 

Next

मुंबई अहमदाबाद महामार्ग व घोडबंदर महामार्गाच्या वरसावे नाक्यावर असलेल्या एका हॉटेल मध्ये २१ कोरोना रुग्ण सापडल्या नंतर आता महापालिका खडबडून जागी झाली असून रविवारी सदर भागातील अन्य हॉटेलातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली . चाचणीत ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे . 

कोरोना रुग्णांचे प्रमाण मध्यंतरी कमी झाले म्हणून संसर्ग रोखण्यासाठी महत्वाच्या असलेल्या  मास्क घालण्या पासून अनेक निर्देशांचे सर्रास उल्लंघन सुरु झाले . सदर उल्लंघन होत असताना महापालिका , पोलिसांसह नगरसेवक - राजकारणी देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करू लागले . अनेक नगरसेवक - राजकारणी तर स्वतः देखील मास्क घालत नाहीत . त्यातूनच कोरोना रुग्णाच्या संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होऊ लागली . 

तोच शहरातील अतिशय वर्दळीचा आणि राज्यातीलच नव्हे तर अन्य राज्यातील लोक खानपाना साठी थांबण्याचा परिसर असलेल्या वरसावे नाक्यावरील एक्स्प्रेस इन हॉटेलला पालिकेने कोरोना रुग्ण आढळल्याने ४ मार्च पर्यंत सील ठोकले . सदर मोठ्या हॉटेलातील २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले . मोठ्या संख्येने येणारे प्रवाशी हे विविध राज्यातले असल्याने वरसावे नाका व सदर दोन्ही महामार्गाचे वरील हॉटेल - बार, लॉज , पान टपऱ्या , ढाबे आदी कोरोना संसर्ग पसरण्याचे हॉट स्पॉट ठरण्याची शक्यता आहे . 

त्यामुळे नेहमीच विविध राज्यातील लोकांनी गजबलेल्या ह्या परिसरातील हॉटेलां मधील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी रविवारी महापालिकेने केली . प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत सह अनेक वैधकीय अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते . हॉटेल सी एन रॉक , फाउंटन , शेल्टर आदी काही हॉटेल व आस्थापनां मधील २३१ जणांची अँटीजेन चाचणी केली असता त्यातील ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले . तर २२५ जणांची आरटीपीसीआर चाचणी केली गेली आहे .  

जे हॉटेल व लॉज नियमाचे पालन करणार नाहीत अशा हॉटेल चालक व मालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करून हॉटेल सील करण्यात येणार आहे असे प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांनी सांगितले आहे.  

Web Title: Corona inspections by the Hotel Staff Corporation in the Varsave Naka area; 6 employees found positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.