कोरोना मोहिमेतून शिक्षकांना वगळणार; शाळा, मंदिरे, प्रार्थना स्थळे खुली होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 05:13 PM2021-10-01T17:13:04+5:302021-10-01T17:16:45+5:30

या पार्श्वभूमीवर गुरुवारी महापौर नरेश म्हस्के व शिक्षण समिती सभापती योगेश जानकर यांनी ठाणे महापालिकेतील शिक्षण विभागासमवेत बैठक घेवून शाळांची साफसफाई, रंगरंगोटी व सर्व शाळांची पाहणी करू न आवश्यक ती स्थापत्य कामे तात्काळ करू न घेण्याचे आदेश सर्व संबंधित विभागांना दिले.

from the Corona campaign teachers will be exclude ; Schools, temples, places of worship will be open | कोरोना मोहिमेतून शिक्षकांना वगळणार; शाळा, मंदिरे, प्रार्थना स्थळे खुली होणार

कोरोना मोहिमेतून शिक्षकांना वगळणार; शाळा, मंदिरे, प्रार्थना स्थळे खुली होणार

Next

ठाणे - शासनाच्या आदेशानुसार ४ ऑक्टोबरपासून ठाणे शहरातील इयत्ता ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे ठाणे महापालिकेच्या वतीने शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने महापालिका शाळातील जे शिक्षक कोवीड सेंटर, रेल्वे स्टेशनवर कोवीड लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी कामाला होते, त्यांना आता यातून कार्यमुक्त करावे, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत. (from the Corona campaign teachers will be exclude ; Schools, temples, places of worship will be open)

तसेच, ८वी ते १२वी पर्यंत सर्व शाळा बाजूच्या आरोग्य केंद्राशी सलग्न कराव्यात, अशा सुचनाही त्यांनी दिल्या आहेत. तसेच येत्या ७ ऑक्टोबरपासून शहरातील सर्व प्रार्थनास्थळे आणि मंदिरेही कोरोनाचे र्निबध पाळून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर गुरुवारी महापौर नरेश म्हस्के व शिक्षण समिती सभापती योगेश जानकर यांनी ठाणे महापालिकेतील शिक्षण विभागासमवेत बैठक घेवून शाळांची साफसफाई, रंगरंगोटी व सर्व शाळांची पाहणी करू न आवश्यक ती स्थापत्य कामे तात्काळ करू न घेण्याचे आदेश सर्व संबंधित विभागांना दिले. त्यानंतर आता महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनीदेखील शाळांसंदर्भात आदेश काढून कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार आठवी ते दहावी र्पयतच्या शाळा या बाजूच्या आरोग्य केंद्राशी सलग्न करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय प्रत्येक वर्गात केवळ १५ ते २० विद्यार्थी असावेत, विद्यार्थी शाळेत यावेत यासाठी पालकांची परवानगी घेणे गरजेचे, जास्तीचे विद्यार्थी असल्यास दोन सत्रत शाळा घ्याव्यात, शाळा पुर्णपणो निजर्तुकीकरण करून घ्याव्यात, तसेच ज्या शाळांमध्ये लसीकरण केंद्र, कोवीड सेंटर सुरु होते, त्या शाळांची स्वच्छता व साफसफाई करून घ्यावी, सॅनीटाईज करुन घ्याव्यात, याशिवाय जे शिक्षक कोरोना मोहीमेत सहभागी झालेले असतील त्यांना कार्यमुक्त करुन शाळेत परत पाठवावे, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे येत्या ७ ऑक्टोबरपासून मंदिरे, प्रार्थना स्थळे सुरु करण्यासही आता परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार कोरोना र्निबध पाळून मंदिरे, प्रार्थना स्थळे सुरु ठेवावीत असेही सांगण्यात आले आहे.
 

Web Title: from the Corona campaign teachers will be exclude ; Schools, temples, places of worship will be open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.