बील मिळण्यासाठी ठेकेदाराचे मुख्यालयात उपोषण; 100 कोटींची बील अद्यापही पेंडीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:54 PM2020-07-06T17:54:06+5:302020-07-06T17:54:23+5:30

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोक:या गेल्या, अनेक उद्योग बंद पडू लागले आहेत, अनेकांच्या पगारातून कपात झालेली आहे. असे असतांना आता शहरात विविध प्रकारची कामे करणा:या ठेकेदारांचीही बिले आता निघाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

The contractor's fast at headquarters to get the bill; 100 crore bill still pending | बील मिळण्यासाठी ठेकेदाराचे मुख्यालयात उपोषण; 100 कोटींची बील अद्यापही पेंडीग

बील मिळण्यासाठी ठेकेदाराचे मुख्यालयात उपोषण; 100 कोटींची बील अद्यापही पेंडीग

Next

ठाणे  : एकीकडे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे महापालिकेचे मागील तीन महिन्यापासून उत्पन्न मिळू शकलेले नाही. त्यात आता याचा फटका विविध प्रकारची विकास कामे करणा:या ठेकेदारांची बिलेही रखडली असल्याची माहिती समोर आली आहे. अशाच एका ठेकेदाराने महापालिका मुख्यालयात उपोषण केले होते. विशेष म्हणजे महापालिका सुत्रंनी दिलेल्या माहितीनुसार एकाच ठेकेदाराचे बील रखडले नसून अशी सुमारे 100 कोटींच्या आसपास मार्च अखेर र्पयतची बिले अद्यापही अदा झालेली नसल्याची धक्कादायक माहिती या निमित्ताने समोर आली आहे.


कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोक:या गेल्या, अनेक उद्योग बंद पडू लागले आहेत, अनेकांच्या पगारातून कपात झालेली आहे. असे असतांना आता शहरात विविध प्रकारची कामे करणा:या ठेकेदारांचीही बिले आता निघाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वी मार्च अखेर र्पयत बिले निघावीत म्हणून ठेकेदार आणि प्रशासन देखील घाई करीत होते. परंतु आता झालेल्या लॉकडाऊनमुळे महापालिकेवर उत्पन्नाला मुकावे लागल्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या उत्पन्नाच्या एका स्त्रोतूनही पालिकेला एक रुपायचेही उत्पन्न मिळू शकलेले नाही. अशातच मागील आर्थिक वर्षात काम केल्यानंतर मार्च अखेर बील मिळावे म्हणून ठेकेदारांनी पालिकेच्या पाय:या ङिाजवल्या होत्या. परंतु आता जुलै महिना उजाडला तरी देखील अनेक ठेकेदारांना त्यांची बिले मिळू शकलेली नाहीत. त्यामुळे छोटी मोठी कामे करणा:या ठेकेदारांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे. काही ठेकेदारांनी काम मिळविण्यासाठी आधीच इकडून तिकडून पैसे उचलले आहेत, मार्चमध्ये बील मिळाल्यानंतर ते पैसे परत दिले जाणार होते. तसेच विविध विकास कामे करतांना कर्मचा:यांचा पुरवठा करुन कामे पूर्ण झालेली आहेत. तर कर्मचा:यांचे पगारही ठेकेदारांनी अदा केले आहेत. असे असतांना आता या ठेकेदारांची बिले न निघाल्याने त्यांचे देखील हाल सुरु झाले आहेत. यामध्ये छोटी मोठी कामे करणारा ठेकेदार चांगलाच भरडला जात आहे.


दरम्यान मार्च अखेरचे बील मिळावे यासाठी सोमवारी एका ठेकेदाराने महापालिका मुख्यालयात उपोषण केले होते. परंतु प्रशासनाच्या वतीने त्याला कोणीही दाद दिलेली नाही. विशेष म्हणजे शहरातील हाच ठेकेदार नसून असे अनेक छोटे मोठे ठेकेदार मागील काही दिवसापासून बील मिळावे म्हणून महापालिकेचे खेटे घालत आहेत. परंतु त्यांनाही रिकाम्या हातींना परतावे लागत आहे. तर मार्च अखेर र्पयत काम पूर्ण केलेल्या ठेकेदारांची सुमारे 100 कोटींचे बीले अद्यापही काढली गेली नसल्याची माहिती महापालिकेच्या सुत्रंनी दिली आहे. इथे आता महापालिकेवर आपल्याच कर्मचा:यांचे पगार देण्यासाठी काटकसर करावी लागत आहे. त्यात आता ठेकेदारांनी बिलांसाठी मागणी केल्याने पालिकेची तारेवरची कसरत सुरु झाली आहे.

Web Title: The contractor's fast at headquarters to get the bill; 100 crore bill still pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.