काँग्रेस पक्षाचे काम करणाऱ्यांना उमेदवारी देणार; भाई जगताप यांचं उल्हासनगरात विधान 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 05:05 PM2021-10-15T17:05:07+5:302021-10-15T17:05:41+5:30

उल्हासनगरात काँग्रेसची आढावा बैठक संपन्न 

Congress will nominate party workers; Statement of Congress MLA Bhai Jagtap in Ulhasnagar | काँग्रेस पक्षाचे काम करणाऱ्यांना उमेदवारी देणार; भाई जगताप यांचं उल्हासनगरात विधान 

काँग्रेस पक्षाचे काम करणाऱ्यांना उमेदवारी देणार; भाई जगताप यांचं उल्हासनगरात विधान 

Next

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील बाबा प्राईम हॉल मध्ये काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पक्षाचे नेते आमदार भाई जगताप यांच्या उपस्थित गुरवारी संपन्न झाला. जे पक्षाचे काम करेल त्यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी देऊन पक्ष महापालिकेत निर्णायक भूमिकेत असणार असल्याचे ते म्हणाले.

 उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील बाबा प्राईम हॉल मध्ये शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवडणूक आढावा बैठकीचे आयोजन गुरवारी केले होते. बैठकीला पक्षाचे केंद्रीय सचिव बी. एम. संदीप, मुंबई अध्यक्ष व आमदार भाई जगताप, प्रदेश महासचिव राणी अगरवाल, पक्षाच्या गटनेत्या अंजली साळवे आदी जण उपस्थित होते. यावेळी भाई जगताप यांनी जे लोक जनतेची व पक्षाची कामे करतील त्यांनाच निवडणुकीत उमेदवारीची संधी दिली जाईल. असे आश्वासन दिले. तर पक्षाचे केंद्रीय सचिव बी. एम. संदीप यांनी भाजपा सरकारच्या अत्याचाराचा पाढा वाचुन निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखविणार असल्याचे म्हणाले. पक्षाच्या प्रदेश महासचिव राणी अग्रवाल यांनी पक्षाच्या कार्यकर्त्याना मार्गदर्शन करून निवडणुकी साठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

 उल्हासनगर शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी शहर काँग्रेसच्या उपक्रम व कामाची माहिती देऊन येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पक्ष निर्णायक भूमिकेत असेल. असा विश्वास त्यांनी पक्ष नेत्यांना यावेळी दिला. यावेळी शहरातील वकील, समाजसेवक व अनेक तरुण-तरुणींनी तसेच विविध पक्ष संघटनेच्या लोकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमानंतर आमदार भाई जगताप यांनी उल्हासनगर महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांची भेट घेऊन कामगारांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली. त्यानंतर कामगार संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Congress will nominate party workers; Statement of Congress MLA Bhai Jagtap in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.