पोलीस आयुक्तालयाचा प्रारंभ १ ऑक्टोबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 11:59 PM2020-09-21T23:59:34+5:302020-09-21T23:59:43+5:30

हालचालींना वेग : प्रस्तावित नवीन पोलीस ठाण्यांसाठीही जागेची शोधाशोध सुरू

Commissionerate of Police commenced on 1st October | पोलीस आयुक्तालयाचा प्रारंभ १ ऑक्टोबरला

पोलीस आयुक्तालयाचा प्रारंभ १ ऑक्टोबरला

Next


मंगेश कराळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : मिरा-भार्इंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाला राज्य सरकारने हिरवा कंदील दिला, पण अद्याप नोटिफिकेशन निघालेले नसून लवकरच निघणार असल्याचे कळते. पोलीस आयुक्तालय कधीपासून सुरू होणार, अशी पोलिसांबरोबरच सामान्यांमध्येही चर्चा सुरू आहे. या पोलीस आयुक्तालयात समावेश होणाऱ्या पोलीस ठाण्यांतून गुन्ह्यांसंदर्भात माहिती गोळा करून डेटा बनविण्याचे काम जोरात सुरू आहे. तर प्रस्तावित पोलीस ठाणी, डीसीपी, एसीपी कार्यालयांसाठी जागेची पाहणी किंवा भाडेतत्त्वावर घेण्याची सुरुवात झालेली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजाचा शुभारंभ १ आॅक्टोबरला होण्याची दाट शक्यता आहे.
वसई तालुक्यातील सातही पोलीस ठाण्यातून हत्या, हत्येचे प्रयत्न, दरोडे, जबरी चोºया अशा गंभीर गुन्ह्यांची माहिती तसेच मनुष्यबळ, दुचाकी आणि चारचाकी वाहन संख्या आणि उपलब्ध इलेक्ट्रॉनिक उपकरणे मागवून डेटा बनविण्याची सुरुवात झाली असल्याचेही कळते. मिरा रोडमध्ये महानगरपालिकेकडून भाडेतत्त्वावर घेतलेले कार्यालय १ आॅक्टोबरला सुरू होणार असल्याचे सूत्रांकडून कळते.
वसई तालुक्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता नवनियुक्त पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी याच विभागात आपले लक्ष केंद्रित केले आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या शहरातील पोलीस ठाण्यात किंवा आजूबाजूच्या परिसरात ते भेटी देऊन भौगोलिक आढावा घेऊन माहिती गोळा करत आहे. तसेच त्यांनी राहण्यासाठीही वसईची निवड केली असून ते रोज या ठिकाणाहून मिरा रोड येथील आयुक्तालयात रोज ये-जा करणार आहेत. दरम्यान, परिमंडळ-१ मध्ये सध्याचे वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांची डीसीपी म्हणून वर्णी लागणार असल्याची आणि परिमंडळ-२ येथे नवनियुक्त आयपीएस दर्जाचे अधिकारी डीसीपी म्हणून येणार असल्याची चर्चा आहे. राजकुमार शिंदे नावाचे वरिष्ठ अधिकारी डीसीपी म्हणून येणार असल्याचेही बोलले जात आहे.
१४ वाहने लवकरच
होणार दाखल
नवीन पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजाबाबत जोरदार हालचाली सुरू असून मीरा-भार्इंदर येथील पोलीस ठाण्यासाठी ७ आणि वसई-विरार येथील पोलीस ठाण्यासाठी ७ अशी १४ चारचाकी वाहने ताफ्यात लवकरच दाखल होणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातील १४ पोलीस वाहनचालकांना पुणे येथे पाठविण्यात आले आहे.
अशी असणार रचना
नवीन पोलीस आयुक्तालयाची तीन परिमंडळांमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. पहिल्या परिमंडळात मीरा रोड, काशिमीरा आणि भार्इंदर, दुसºया परिमंडळात वसई आणि नालासोपारा तर तिसºया परिमंडळात तुळिंज आणि विरार यांचा समावेश असणार आहे. संपूर्ण आयुक्तालयात पाच डीसीपी, ८ ते ९ एसीपी, ७२ पोलीस निरीक्षक असणार आहेत.

Web Title: Commissionerate of Police commenced on 1st October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस