मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे कॉलेज तरुणीचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 09:21 PM2020-02-11T21:21:24+5:302020-02-11T21:22:53+5:30

बदलापुरात तरुणीचा लोकलसमोर आत्महत्येचा प्रयत्न

College young girl's life saved by motorman | मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे कॉलेज तरुणीचे प्राण

मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे कॉलेज तरुणीचे प्राण

googlenewsNext
ठळक मुद्देमोटरमनने प्रसंगावधान राखत वाचवले तरुणीचे प्राण काल सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

बदलापूर - कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणीने लोकलसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बदलापूररेल्वे स्थानकात काल घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तरुणीचे प्राण वाचले आहेत. 



काल सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बदलापूर रेल्वे स्थानकात फ्लॅट क्रमांक १ वर बदलापूर लोकल शिरत असताना अचानक एका मुलीने ट्रॅकवर उडी घेतली. यावेळी मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक मारले. तरुणी बदलापूर येथे एका कॉलेजमध्ये जाते. मात्र, तरुणीला लोकलची हलकीशी धडक बसली आणि ती खाली पडली. यानंतर मोटरमनने या मुलीला बाहेर काढत पाणी पाजून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं. तिच्या चौकशीत ही तरुणी अल्पवयीन असल्याचं समोर आल्यानं रेल्वे पोलिसांनी तरुणीच्या पालकांना बोलावून समजूत काढून मुलीला त्यांच्या ताब्यात दिलं. याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Web Title: College young girl's life saved by motorman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.