डंपरनं रेल्वे गेटला धडक दिल्यानं तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 06:29 AM2020-01-03T06:29:50+5:302020-01-03T06:41:06+5:30

कल्याणहून मुंबईकडे होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प

central railway service affects after technical problem in overhead wire | डंपरनं रेल्वे गेटला धडक दिल्यानं तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा

डंपरनं रेल्वे गेटला धडक दिल्यानं तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा

Next

ठाणे: टिटवाळा ते आंबिवलीच्या दरम्यान विद्युत वायर तुटल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कामाला जाण्यासाठी निघालेल्या हजारो लोकांचे हाल होणार आहेत. सकाळी लवकर कार्यालयात जाण्यासाठी निघालेले अनेक जण रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानं टिटवाळा ते कल्याण दरम्यान रिक्षानं प्रवास करत आहेत. मात्र प्रवाशांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन काही रिक्षा चालकांनी ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा भाडं आकारण्यास सुरुवात केली आहे.



वाळूच्या डंपरने रेल्वे गेटला धडक दिल्यानं कसारा ते कल्याण अप डाऊन वाहतूक बंद असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दिली. डंपर धडक दिल्यामुळे ओव्हरहेड वायरमधून होणारा विद्युत पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे आंबिवलीजवळ लोकल अर्ध्या तासापासून रखडली आहे. कल्याणहून मुंबईकडे होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून लांब पल्ल्यांच्या गाड्यांनादेखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Web Title: central railway service affects after technical problem in overhead wire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.