A case has been registered against a BJP corporator in Bhayander for assaulting and abusing residents | भाईंदरमधील भाजपा नगरसेविकेवर रहिवाशांना मारहाण, शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल   

भाईंदरमधील भाजपा नगरसेविकेवर रहिवाशांना मारहाण, शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल   

मीरारोड - भाईंदर पश्चिमच्या भाजपा नगरसेविका नयना गजानन म्हात्रे यांनी त्यांच्या प्रभागातील एका रहिवाश्याच्या डोक्यात दगड जखमी केले तर त्याच्या आई , पत्नीस शिवीगाळ भावास मारले म्हणून भाईंदर पोलिसांनी नगरसेविके विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . 

नयना म्हात्रे भाईंदर पश्चिमेच्या मुर्धा ते मोरवा व दीडशे फूट मार्ग भागातील भाजपाच्या नगरसेविका आहेत . त्या मुर्धा येथे राहतात . तेथील रेव आगार येथे राहणारे रहिवाशी दिलीप बनसोडे यांच्या फिर्यादी वरून गुरुवारी रात्री भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

बनसोडे हे गुरुवारी सायंकाळी घरी असताना म्हात्रे यांचा कार्यकर्ता असलेल्या अमरेंद्र नावाच्या इसमाचा पाळीव श्वान अंगावर धावून गेला . बनसोडे यांची पॅन्ट धरली . त्यावरून बनसोडे याने सुटकेसाठी श्वानास दगड मारला असता अमरेंद्र याने शिविगाळ करत मारण्याची दिली . बनसोडे घरी निघून आले . 

सदर प्रकार कळताच काही वेळात नगरसेविका नयना म्हात्रे बनसोडे यांच्या घरात शिरून बनसोडेसह , त्यांची आई व  भाऊ राहुल यास शिवीगाळ  करू लागली . राहुलला मारले तर पत्नीस धक्का मारला . नंतर दगड घेऊन नयना यांनी  बनसोडे यांच्या डोक्यावर मारला. त्यामुळे ते जखमी झाले . सदर फिर्यादी नुसार पोलीसांनी नयना व अमरेंद्र विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .

Web Title: A case has been registered against a BJP corporator in Bhayander for assaulting and abusing residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.