कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठामपा कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 12:20 AM2021-04-04T00:20:02+5:302021-04-04T00:21:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महानगर पालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. या प्रादुर्भावावर प्रतिबंध ...

Canceled the leave of the Thampa staff on the back of the Corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठामपा कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई

Next
ठळक मुद्दे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महानगर पालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. या प्रादुर्भावावर प्रतिबंध आणण्यासाठी ठाणे महापलिका प्रशासनाने पालिका सेवेतील सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. सुट्टीच्या दिवशी जे अधिकारी गैरहजर राहतील, त्यांच्या
विरु ध्द कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
ठाणे महानगर पालिकाक्षेत्रात गेल्या दीड महिन्यांपासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरु वात केली आहे. यात रोज बाधितांचीही संख्या वाढत आहे. या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यानुसार कोरोना विषाणू साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ नुसार कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध तसेच नियंत्रणासाठी अधिसूचना १४ मार्च २०२० नुसार अमलबजावणी करण्यात येत आहे. त्यात ठाणे महापालिका क्षेत्रातील बाधितांच्या संख्येत तसेच क्वारंटाइन केलेल्या
रु ग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडे उपलब्ध असलेल्या अधिकारी आणि कर्मचाºयांची कोविड च्या कामासाठी नियुक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीचा विचार करता, पालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाºयांना सुटीच्या दिवशीही पुढील आदेश होईपर्यंत कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. जे अधिकारी गैरहजर राहतील, त्यांच्या विरु ध्द साथ रोग प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

Web Title: Canceled the leave of the Thampa staff on the back of the Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.