मुंबईतील हजारो कोटींच्या घोटाळयातील कंपनीचा सीए ठाण्यातून बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 10:47 PM2020-10-14T22:47:13+5:302020-10-14T22:52:47+5:30

मुंबईतील ‘कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज लिमिटेड ट्रनर मॉडीसन’ या आंतरराष्ट्रीय टूर्स कंपनीचा लेखापाल (सीए) सागर सुहास देशपांडे (३८) हा ठाण्यातून अचानक बेपत्ता झाला आहे. याच कंपनीत चार हजार कोटींचा घोटाळाही झाला आहे. त्यामुळे सागरच्या बेपत्ता होण्याने कुटूंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे.

CA of a company involved in a multi-crore scam in Mumbai goes missing from Thane | मुंबईतील हजारो कोटींच्या घोटाळयातील कंपनीचा सीए ठाण्यातून बेपत्ता

नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार

Next
ठळक मुद्दे नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रारटिटवाळयाला जाऊन येतो, इतकीच दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: तब्बल चार हजार कोटींचा घोटाळा असलेल्या मुंबईतील ‘कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज लिमिटेड ट्रनर मॉडीसन’ या आंतरराष्ट्रीय टूर्स कंपनीचा लेखापाल (सीए) सागर सुहास देशपांडे (३८, रा. चरई, ठाणे) हा ठाण्यातून अचानक बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात त्याच्या कुटूंबियांनी तक्रार दाखल केली असून त्याच्या बेपत्ता होण्यामागे अनेक तर्कवितर्क केले जात आहेत.
ठाण्यातील चरई भागात राहणारे सागर हे ११ आॅक्टोबर रोजी टिटवाळयाला जाऊन येतो, असे सांगून घरातून बाहेर पडले. ते एमएच- ०४- जीएम-३५१५ या क्रमांकाच्या मोटारकारने कंपनीच्या टिटवाळा येथील कार्यालयाकडे गेल्याचे सांगण्यात येते. ‘कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज लिमिटेड ट्रनर मॉडीसन’ या कंपनीच्या मुंबई आणि टिटवाळा येथे शाखा आहेत. या कंपनीमध्ये चार हजार कोटींचा घोटाळा झालेला आहे. त्यामुळे कंपनीतील एका संचालकाला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटकही केली आहे. याच प्रकरणातील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कॉफर्ड मार्केट येथील कार्यालयात गेल्या आठवडयापूर्वी बोलविले होते. त्यांच्याकडे आणखी चौकशी बाकी असल्यामुळे त्यांना पुन्हा १३ आॅक्टोबर रोजी पाचारण करण्यात आले होते. मात्र, तत्पूर्वीच ११ आॅक्टोबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास टिटवाळा येथे जाऊन येतो, असे त्यांनी त्यांचे वडील सुहास देशपांडे यांना सांगितले. त्यानंतर ते परत न आल्यामुळे याप्रकरणी देशपांडे कुटूंबियांनी नौपाडा पोलीस ठाण्यात १२ आॅक्टोबर रोजी ते बेपत्ता असल्याबाबतची तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरज जोंधळे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
* ज्या कंपनीत हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे. त्याच कंपनीचे सीए असलेले सुहास ठाण्यातून अचानक बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांनी चिंता व्यक्त केली आहे.

Web Title: CA of a company involved in a multi-crore scam in Mumbai goes missing from Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.