सर्वत्र घुमला ‘बम बम भोले’चा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:56 PM2020-02-21T23:56:02+5:302020-02-21T23:56:13+5:30

महाशिवरात्रीचा उत्साह : कल्याण-डोंबिवलीत भक्तिमय वातावरण

The buzz of 'Bum Bum Bhole' roamed everywhere | सर्वत्र घुमला ‘बम बम भोले’चा जयघोष

सर्वत्र घुमला ‘बम बम भोले’चा जयघोष

Next

डोंबिवली : महाशिवरात्रीनिमित्त कल्याण-डोंबिवलीतील शिवमंदिरांमध्ये शुक्रवारी भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. ‘ओम नम: शिवाय’, ‘बम बम भोले’च्या घोषाने कल्याण-डोंबिवलीतील वातावरण शिवमय झाले होते. या सणानिमित्त ठिकठिकाणी धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

सागाव परिसरातील पिंपळेश्वर मंदिरात महापौर विनीता राणे यांनी दर्शन घेतले. येथे नेत्रतपासणी आणि चष्मोवाटप तसेच आरोग्य शिबिरही पार पडले. ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत यांचे कीर्तन झाले. यावेळी पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळाचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे, उपाध्यक्ष रतन म्हात्रे, सचिव पंढरीनाथ पाटील, शिवसेना नगरसेविका प्रेमा म्हात्रे आदी उपस्थित होते. खिडकाळेश्वर महादेव मंदिर येथून पदयात्रा काढण्यात आली. गोपाळकृष्ण भजन मंडळ काटई यांचे भजन, हभप राजाराम महाराज उसाटणे यांचे कीर्तन झाले. तसेच, या मंदिरात सात वर्षांपासून फुलांचा अभिषेक केला जात आहे. कोपर गावातील स्वयंभू नागेश्वर मंदिरात भाविकांनी दुग्धाभिषेक केला. नगरसेवक रमेश म्हात्रे यांनीही यावेळी दर्शन घेतले. श्री सागावेश्वर शिवमंदिरात महाशिवरात्री उत्साहात पार पडली. आ. रवींद्र चव्हाण आदींनी राजकीय व्यक्तींनी शिवशंकराचे दर्शन घेतले. मानस प्रचार हौसाबाई चॅरिटेबल सेवा संस्थानतर्फे श्रीराम कथा प्रवचन आणि ज्ञानयज्ञ पार पडला. महेश पाटील प्रतिष्ठान आणि युवा संघर्ष सामाजिक विकास संस्था यांच्यातर्फे पाथर्ली परिसरातील शिवमंदिर आणि शेलार चौक शिवमंदिर येथे साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
श्री गणेश मंदिर संस्थानात दहीभाताचे शिवलिंग तयार करण्यात आले होते. त्यानंतर, शिवआराधना आणि पूजा करण्यात आली. तसेच सरखोत ट्रस्टतर्फे स्वामींचे घर येथे गरीब आणि कष्टकरी महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माधवी सरखोत उपस्थित होत्या.

गंगागोरजेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

च्टिटवाळा : महाशिवरात्रीनिमित्त शहराजवळील शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. श्रीक्षेत्र गंगागोरजेश्वर मंदिर, वासुंद्री, मांडा येथील काळू नदीकिनाऱ्यावर आणि टिटवाळ्यातील मुख्य रस्त्यावरील शिवमंदिर गजबजले होते. गुरुवारी रात्रीपासूनच ‘बम बम भोले’चा जयघोष घुमत होता.

च्कल्याण तालुक्यापासून जवळ असलेले शहापूर तालुक्यातील गंगागोरजेश्वर हे पांडवकालीन देवस्थान असून या मंदिरातील शिवलिंगावर रात्री १२ वाजता कारंजे प्रकटून त्याचा अभिषेक होतो. हे दृश्य पाहण्यासाठी हजारो भाविक मंदिरात गर्दी करतात. त्यानंतर काळू नदीच्या त्रिवेणी संगम पात्रात अंघोळ करून शिवभक्त गोरजेश्वराचे दर्शन घेतात. हजारो भाविकांनी दर्शन घेतल्याचे मंदिर विश्वस्त पंढरी पाटील व गोविंद गायकर यांनी सांगितले.

च् देवस्थानातर्फे अखंड हरिनाम सप्ताह, हरिपाठ, प्रवचने, भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम झाले. टिटवाळा मंदिर रोडवर असलेले शिवमंदिर झेंडूंच्या फुलांनी सजवले होते. या मंदिराबाहेर सायंकाळपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरांबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

ग्रामीणमध्येही उत्साह
म्हारळ : कल्याण तालुक्यातील पाचवा मैल येथील सिद्धेश्वर मंदिर, म्हारळ येथील मराळेश्वर, दहागाव येथील शिवमंदिर, घोलपनगर अमृतधाम येथील शिवमंदिर आणि शहाड येथील नवरंग शिवमंदिरामध्ये शिवरात्रीनिमित्त भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. पिंडीवर दुग्धाभिषेक आणि बेलपत्र वाहण्यासाठी मंदिरांबाहेर शिवभक्तांनी रांगा लावल्या होत्या. मंदिर परिसरांत पोलिसांनी चोख बंदोबस्तही ठेवला होता.
 

Web Title: The buzz of 'Bum Bum Bhole' roamed everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे