ठाण्यात नियोजनाअभावी कोरोनावरील ड्रायरन चाचणीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 11:58 PM2021-01-05T23:58:01+5:302021-01-06T00:02:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोरोनावरील लसीचे ड्रायरन करण्याचे आयोजन मंगळवारी केले होते. मात्र, आयुक्तांसह ...

Break to dry test on corona due to lack of planning in Thane | ठाण्यात नियोजनाअभावी कोरोनावरील ड्रायरन चाचणीला ब्रेक

आयुक्तांसह अनेक अधिकारी चाचणीपासून अनभिज्ञ

Next
ठळक मुद्दे आयुक्तांसह अनेक अधिकारी चाचणीपासून अनभिज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोरोनावरील लसीचे ड्रायरन करण्याचे आयोजन मंगळवारी केले होते. मात्र, आयुक्तांसह महापालिका प्रशासनातील मोठया अधिकाऱ्यांना याची माहिती नव्हती. त्यामुळे ड्रायरन चाचणीला तूर्तास ब्रेक लावण्याची नामूष्की महापालिकेवर ओढवली आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून ठाणे शहरात कोरोना या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. अशातच कोरोनावर लस कधी येणार याची रु ग्णांसह नागरिकांमध्येही आहे. त्यात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही करोना लसींच्या मर्यादित वापरास भारताच्या औषध महानियंत्रकांनी नुकतीच परवानगी दिली. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थितीत ड्रायरन चाचणी घेण्यात आली होती. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने मंगळवारपासून शहरातील पोखरण पोखरण रस्ता 2 येथील आंबेडकर भवनसह पाच ठिकाणी कोरोना लसीकरण सराव फेरीचे नियोजन केले होते. कोपरीतील प्रसृतीगृह, कासारवडवली येथील रोझा गार्डन आरोग्य केंद्र , मुंब्रा प्रेक्षागृह आणि मुंब्य्रातील महापालिका शाळा क्र मांक ७८ याठिकाणी या सराव फेरी होणार होत्या. महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरूडकर यांनी या सराव फेरीचे परस्पर नियोजन केले होते. तसेच फलकही संबंधित केंद्रांवर लावले होते. परंतु, या ड्रायरन चाचणी संदर्भात ठाणे महानगर पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना कोणतीच कल्पना दिलेली नव्हती. त्यांच्या संमतीविनाच या चाचणीचे नियोजन केल्याचे समोर आले आहे. या फेरीसाठी राज्य शासनाकडूनही कोणतेच आदेश आलेले नाहीत. यामुळेच आरोग्य विभागाला ही मोहीम बासनात गुंडाळावी लागली आहे.
दरम्यान, आयुक्तांची परवानगी मिळाली नसल्यामुळे मंगळवारपासून करोना लसीकरण सराव फेरी सुरु होऊ शकलेली नसल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरूडकर यांनी दावा केला. ही मोहिम सुरु करण्याबाबत आयुक्तांसोबत चर्चा सुरु असल्याचेही ते म्हणाले.
 

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना लसीकरण सराव फेरी घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, राज्य शासनाकडून सराव फेरी घेण्याबाबत अद्याप कोणतेही आदेश आलेले नाहीत. त्यामुळे आयुक्तांनी सराव फेरीची तारीख अद्याप निश्चित केली नाही.
संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका

* दरम्यान, पोखरण रोड क्रमांक दोन येथील डॉ. आंबेडकर भवन येथे मंगळवारी नियोजित केलेल्या संभाव्य लसीकरण केंद्रावर नोंदणी केंद्र, प्रतिक्षा कक्ष, लसीकरण केंद्र आणि लसीकरणानंतर रुग्णाचे निरीक्षण करण्यासाठी निरीक्षण केंद्र अशा चार विभागात तयारी केल्याचे आढळले. लसीकरणानंतर संबंधितांना अर्धा तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाणार आहे. दिवसाला किमान ९० ते १०० आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्यात लस दिली जाणार असल्याची माहिती या केंद्राचे समन्वयक राजेश कोळी यांनी दिली.

Web Title: Break to dry test on corona due to lack of planning in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.