Both of them were beaten up by the sisters after being hit by a bike in kalyan | बहिणीला कट मारल्याचा जाब विचारल्याने दोघांना मारहाण
बहिणीला कट मारल्याचा जाब विचारल्याने दोघांना मारहाण

कल्याण : बहिणीला दुचाकीस्वाराने कट मारल्याचा जाब विचारायला गेलेल्या तरुणाला आणि त्याच्या भावोजीला दोघांनी मारहाण केल्याची घटना कोळसेवाडी परिसरात बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्यांस अटक केली आहे.  

पूर्वेतील लोकधारा येथे राहणारा केशव जावळे (२४)  बुधवारी रात्री १० च्या सुमारास त्याचे भाऊजी उमेश बेंडाळे आणि बहिणीसोबत मेडीकल दुकानातून औषधे घेऊन घरी परतत होता. त्यावेळी, केशवच्या बहिणीस दुचाकीवरुन आलेल्या शैलेंद्र शर्मा (२४) आणि प्रतिक परमार यांनी कट मारली. याबाबतचा जाब विचारायला गेलेल्या केशवला या दोघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या केशवच्या बहिणीला शिवीगाळ करत भावजी उमेशच्या पोटात धारदार हत्याराने हल्ला केला. याप्रकरणी केशवने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी शैलेंद शर्मा आणि प्रतिक या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी शैलेंद्रला अटक केली आहे.
 

Web Title: Both of them were beaten up by the sisters after being hit by a bike in kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.