उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेचे नव्हेतर भाजपचे बहुमत, विशेष महासभेसाठी महापौरांना स्मरणपत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 05:21 PM2020-10-05T17:21:03+5:302020-10-05T17:21:29+5:30

Ulhasnagar News : विशेष महासभा घेण्यासाठी भाजपने महापौरांना करून स्मरणपत्र दिली. मात्र महापौर लीलाबाई अशान विशेष महासभा बोलावत नसल्याने वेळ प्रसंगी कोर्टाचे दरवाजे ठोठावण्यात येणार असल्याचे प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी व मनोज लासी यांनी दिली. 

BJP majority in Ulhasnagar Municipal Corporation, reminder to mayor for special general body meeting | उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेचे नव्हेतर भाजपचे बहुमत, विशेष महासभेसाठी महापौरांना स्मरणपत्र

उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेचे नव्हेतर भाजपचे बहुमत, विशेष महासभेसाठी महापौरांना स्मरणपत्र

Next

- सदानंद नाईक 
उल्हासनगर : महापालिका स्थायी व विशेष समिती सदस्य निवडीसाठी स्थगित केलेली विशेष महासभा घेण्यासाठी भाजपने महापौरांना करून स्मरणपत्र दिली. मात्र महापौर लीलाबाई अशान विशेष महासभा बोलावत नसल्याने वेळ प्रसंगी कोर्टाचे दरवाजे ठोठावण्यात येणार असल्याचे प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी व मनोज लासी यांनी दिली. 

उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने स्थानिक साई पक्षा सोबत आघाडी करून महापौर पद मिळविले. मात्र अद्दीच वर्षानंतर भाजपतील ओमी कलानी टीम समर्थक १० नगरसेवकांनी महापौर निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्या ऐवजी शिवसेनेच्या लीलाबाई अशान यांना मतदान करूंन महापौरपदी निवडून आणले. भाजपतील ओमी टीम समर्थक नगरसेवक शिवसेना सोबत असलेतरी त्यांची गणना भाजप मध्ये होते. दरम्यान स्थायी व विशेष समिती सदस्य निवडणुकीत भाजपने विशेष समिती सदस्यासह सभापती पद देण्याचे आमिष ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांना दिल्यावर त्यांनी भाजपकडे जाण्याचा निर्णय घेतला. स्थायी व विशेष समिती मध्ये भाजपचे बहुमत असल्याने सर्व सभापती पदे भाजपकडे जाणार असल्याने शिवसेनेची कोंडी होणार आहे. हे ओळखून स्थायी व विशेष समिती सदस्य निवडणूक पुढे ढकलण्यासाठी विशेष महासभा स्थगित केल्याचा आरोप मनोज लासी यांनी केला. 

भाजपने विशेष महापालिका महासभा घेण्यासाठी २६ पेक्षा जास्त नगरसेवकांच्या सहीचे पत्र भाजपने महापौर यांना देवून ३ स्मरणपत्र दिली. मात्र अद्यापही महापौरांकडे काहीएक उत्तर आले नसल्याची माहिती भाजपचे नगरसेवक मनोज लासी यांनी दिली. दरम्यान भाजपतील नाराज ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवक पुन्हा भाजपकडे आल्याने महापालिकेत भाजपचे बहुमत आहे. तर सत्ताधारी शिवसेना अल्पमतात येवून बहुमताच्या जोरावर भाजप महासभेत शिवसेनेला कोंडीत पकडणार असल्याचेही मनोज लासी म्हणाले. महापौर, उपमहापौर व सभागृह नेते पद शिवसेना, रिपाइं कडे असलेतरी इतर पदे भाजपकडे आहेत. तसेच महापालिकेत ७८ पैकी ४१ पेक्षा जास्त नगरसेवक भाजपचे असून शिवसेना अल्पमतात गेल्याने शहर विकासासाठी शिवसेनेने भाजप सोबत येण्याची गरज असल्याचे मत लासी यांनी व्यक्त केले. 

 शहरविकासासाठी शिवसेना कटिबद्ध

महापालिका महापौर, उपमहापौर, सभागृह नेते पद शिवसेनेकडे आहेत. तसेच प्रत्यक्षात स्थायी व विशेष समिती सभापदी पदाची निवडणूक होईल. भाजपला स्वतःची ताकद दिसणार असून शहर विकासासाठी शिवसेना मित्र पक्ष कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे.

Web Title: BJP majority in Ulhasnagar Municipal Corporation, reminder to mayor for special general body meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.