भाजप नगरसेवकाविरोधात तक्रार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:27 PM2020-02-22T23:27:47+5:302020-02-22T23:27:55+5:30

काँग्रेसच्या सदस्यांना फोडण्याचा प्रयत्न, शिवसेनेच्या सदस्याही गोव्यात

BJP lodges complaint against corporator | भाजप नगरसेवकाविरोधात तक्रार दाखल

भाजप नगरसेवकाविरोधात तक्रार दाखल

googlenewsNext

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी २६ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपचे नगरसेवक फुटण्याची धास्ती असल्याने नगरसेवकांना गोव्याला हलवले आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न करणारे भाजप नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांच्याविरोधात नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महापालिकेत भाजपचे ६१, शिवसेना २२ व काँग्रेस आघाडीचे १२ नगरसेवक आहेत. भाजपमधील असंतोषामुळे नगरसेवक फुटण्याच्या धास्तीने नगरसेवकांना गोव्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. शिवसेना व काँग्रेस महाविकास आघाडीचे ३४ नगरसेवक असून भाजपकडे स्पष्ट बहुमत असूनही त्यांना नगरसेवक फुटण्याची धास्ती आहे. त्यातच, आमदार गीता जैन व समर्थक नगरसेवकांनी माजी आमदार नरेंद्र मेहतांविरोधात आघाडी उघडल्यास भाजपला फटका बसण्याची चिन्हे आहेत.

धास्तावलेल्या भाजप नेतृत्वाने आता काँग्रेस आघाडीचे नगरसेवक फोडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातूनच काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका उमा सपार यांना फोडण्यासाठी पाटील यांनी सतत फोन करून आमिष दाखवण्यासह मानसिक त्रास दिल्याची तक्रार काँग्रेसने नयानगर पोलीस ठाण्यात केली आहे. शुक्रवारी रात्री काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे, कार्याध्यक्ष प्रमोद सामंत, नगरसेवक अनिल सावंत, राजीव मेहरा, माजी नगरसेवक शफिक खान, पदाधिकारी दीप काकडे आदींनी नयानगर पोलीस ठाण्यात पाटील यांच्याविरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सपार या ज्येष्ठ नगरसेविका असून त्या आजारी आहेत. असे असताना पाटील हे सपार व त्यांच्या मुलास सतत फोन करून भाजपला साथ देण्यासाठी आमिष दाखवत आहेत. पोलिसांनी ध्रुवकिशोर यांना फोन करून पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले असता आपण २६ फेब्रुवारी रोजी शहरात येणार असल्याचे सांगितले.दरम्यान, शिवसेनेच्या अनिता पाटील, काँग्रेसचे नरेश पाटील, काँग्रेस आघाडीचे अमजद शेख हे तिघे नगरसेवकही गोव्याला भाजप नगरसेवकांसोबत आहेत.

सत्ता, संपत्तीसाठी लाचार
भाजपकडे स्पष्ट बहुमत असताना त्यांना त्यांच्याच नगरसेवकांवर विश्वास नसल्याचे स्पष्ट होते. सत्ता आणि संपत्तीसाठी लाचार असणाºया भाजपच्या अशा नगरसेवकां बद्दल देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी खुलासा करून मीरा-भार्इंदरच्या जनतेची माफी मागावी, असे आवाहन मालुसरे यांनी केले आहे.

उमा सपार या पूर्वीपासून परिचित असल्याने निवडणुकीत सहकार्य करा व आशीर्वाद असू द्या असे त्यांना सांगितले होते. कोणतेही आमिष दाखवले नाही किंवा त्रास दिला नाही. - ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक.

Web Title: BJP lodges complaint against corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.