Mira Bhayander: मीरा भाईंदर मनपाच्या महासभेत भाजपा नगरसेविका आमने-सामने, अर्वाच्च अपशब्द वापरत गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 09:27 PM2022-05-17T21:27:07+5:302022-05-17T21:27:36+5:30

Mira Bhayander Municipal Corporation: मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंगळवारच्या महासभेत सत्ताधारी भाजपच्या मेहता समर्थक व विरोधक नगरसेविकांमध्ये अर्वाच्च शब्द वापरत राडा झाला. अपशब्द - गोंधळ नको म्हणून आमदार गीता जैन मध्ये पडल्या असता त्यांच्या अंगावर देखील भाजपा नगरसेविका धाऊन गेल्या.

BJP corporators face-to-face in Mira Bhayander Municipal Corporation's general body meeting, using obscene language | Mira Bhayander: मीरा भाईंदर मनपाच्या महासभेत भाजपा नगरसेविका आमने-सामने, अर्वाच्च अपशब्द वापरत गोंधळ

Mira Bhayander: मीरा भाईंदर मनपाच्या महासभेत भाजपा नगरसेविका आमने-सामने, अर्वाच्च अपशब्द वापरत गोंधळ

googlenewsNext

मीरारोड - मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंगळवारच्या महासभेत सत्ताधारी भाजपच्या मेहता समर्थक व विरोधक नगरसेविकांमध्ये अर्वाच्च शब्द वापरत राडा झाला. अपशब्द - गोंधळ नको म्हणून आमदार गीता जैन मध्ये पडल्या असता त्यांच्या अंगावर देखील भाजपा नगरसेविका धाऊन गेल्या. तर हे ठरवून रचलेले कारस्थान असल्याने सखोल चौकशी ची मागणी शिवसेना व काँग्रेसने केली आहे. 

मेहतांविरुद्ध गुन्हा नोंदवणाऱ्या भाजपच्या नगरसेविका निला सोंस यांनी महासभेत त्यांच्या प्रभागातील मीरारोडच्या आरक्षण क्र. ३०५ मध्ये बगीच्याच्या जागेत हॉटेल - बार बनविण्या विरुद्ध ज अन्वये प्रस्ताव दिला होता. सायंकाळी त्यावर चर्चा सुरू झाली असताना सदर प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्याने चर्चा करता येणार नाही असे सांगण्यात आले. त्यावर चर्चा होत असताना भाजपाचेच नगरसेवक अरविंद शेट्टी यांनी सोंस यांना तुम्हीच बेकायदेशीर बांधकामे केली असल्याचे सुनावले. त्यावरून वादावादी व बोलचाली सुरू झाल्या. मेहता समर्थक रुपाली मोदी ह्या तर सोंस यांच्या जवळ धाऊन जात माईक खेचू लागल्या. तर हेतल परमार व शानु गोहिल ह्या देखील सोंस यांच्या बद्दल बोलू लागल्या. 

ह्या गदारोळात आमदार गीता जैन यांनी सोंस यांना बोलू द्या सांगत बाजू घेतल्याने भाजपा नगरसेविका यांनी मोर्चा त्यांच्या कडे वळवला. शाब्दिक वाद सुरू झाला व नंतर परमार ह्या हातात बाटली घेऊन आ. जैन यांच्या अंगावर धावून गेल्या. त्यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी परमार यांना रोखले. अखेर बाहेर असलेल्या सुरक्षा रक्षकांना आत पाचारण करण्यात आले . त्यांनी नगरसेविकांना बाजूला केले. 

सोंस व आ. जैन यांनी चुकीचे शब्द वापरल्याने नगरसेविका भडकल्या असा आरोप भाजपातील मेहता समर्थक करत आहेत. तर सोंस व आ. जैन यांच्यावर अपशब्द वापरून हल्ला करणाऱ्या मेहता समर्थक नगरसेविकांवर व त्या मागच्या सुत्रधारांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना, काँग्रेसने केली आहे.  असले राडे ह्या आधी देखील मेहता समर्थक नगरसेविकांनी केले असल्याने चौकशीची मागणी शिवसेना गटनेत्या नीलम ढवण यांनी केली आहे. 

Web Title: BJP corporators face-to-face in Mira Bhayander Municipal Corporation's general body meeting, using obscene language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.