भिवंडीत डाइंग कंपनीला भीषण आग; साठवून ठेवलेले कापड जाळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 03:14 PM2020-09-26T15:14:08+5:302020-09-26T15:14:18+5:30

नरपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शंकर डाइंगला हि आग लागली होती. डाइंग मध्ये साठवून ठेवलेले कापड या आगीत जाळून खाक झाले आहे.

Bhiwandi Dyeing Company catches fire; Burn the stored cloth | भिवंडीत डाइंग कंपनीला भीषण आग; साठवून ठेवलेले कापड जाळून खाक 

भिवंडीत डाइंग कंपनीला भीषण आग; साठवून ठेवलेले कापड जाळून खाक 

Next

भिवंडी  - भिवंडीत आगीचे सत्र सुरुच असून पुन्हा एका कपडा साठवलेल्या. डाइंग कंपनीला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.  नरपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शंकर डाइंगला हि आग लागली होती. डाइंग मध्ये साठवून ठेवलेले कापड या आगीत जाळून खाक झाले आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने दोन तासानंतर हि आग आटोक्यात आली आहे. विशेष म्हणजे याठिकाणी कामगार नसल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नसली तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर ही आग नेमकी कशामुळे लागली याची अधिकृत माहिती मिळाली नसली तरी शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. भिवंडीत गेल्या महिन्याभरात लहान मोठ्या आगीच्या 5 ते 6  घटना घडल्या आहेत. भिवंडीत वारंवार आगी लागण्याच्या घटना घडत असल्याने या आगी नेमकी का लागतात याचा शोध घेणे गरजेचे असून नेहमीच विनाकारण लावणाऱ्या या आगीनमध्ये इन्शुरन्सचा वास येतो का यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. 

Web Title: Bhiwandi Dyeing Company catches fire; Burn the stored cloth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.