"भारतीय जनता पक्षानेच मराठ्यांना काळा दिवस दाखवला"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 01:22 AM2020-10-08T01:22:56+5:302020-10-08T01:23:13+5:30

हरिभाऊ राठोड यांचा आरोप; १५ ऑक्टोबरला राज्यभर आंदोलन

"Bharatiya Janata Party showed black day to Marathas" | "भारतीय जनता पक्षानेच मराठ्यांना काळा दिवस दाखवला"

"भारतीय जनता पक्षानेच मराठ्यांना काळा दिवस दाखवला"

Next

ठाणे : मराठ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार भाजप सरकारने राज्यांकडून हिरावून घेतला आहे. या निर्णयामुळे ९ सप्टेंबर हा मराठा समाजाने काळा दिवस घोषित केला. या समाजावर ही वेळ भाजपच्या केंद्र सरकारमुळे आणि महाराष्ट्राच्या तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमुळे आली, असा आरोप भटक्या-विमुक्तांचे, ओबीसी समाजाचे नेते तथा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, बंजारा आरक्षण, क्रिमीलेअर, बढतीमधील आरक्षण, तांडा सुधार अशा प्रलंबित प्रश्नांवर गोरबंजारा समाजाला न्याय मिळण्यासाठी १५ आॅक्टोबरला राज्यभर तहसीलदार कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफडे बजाओ आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, केंद्र सरकारने २0१८ मध्ये राष्ट्रीय मागास आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासंदर्भात कायदा मंजूर केला. याअंतर्गत घटनेच्या काही अनुच्छेदांमध्ये सुधारणा करण्यात आली. एसईबीसी घोषित करण्याचे राज्याचे अधिकार काढून संसदेला दिले. त्यामुळे आता कुठल्याही राज्याला एखाद्या समाजास ओबीसीत घ्यायचे झाल्यास संसदेची मंजुरी लागणार आहे. वास्तविक, घटनेच्या अनुच्छेदात सुधारणा करण्यासाठी राज्यसभेत विधेयक चर्चेला आले होते. यावर जनतेकडून सूचना व हरकती मागविल्या होत्या. त्याचवेळी आपण दुरुस्ती सुचविली होती. या दुरुस्तीसंदर्भात विचार झाला असता, तर मराठा समाजावर ही वेळ आली नसती, असे त्यांनी म्हटले आहे.

‘मी देणार फॉर्म्युला’
भाजप सरकारमुळे मराठा आरक्षणावर संकट ओढवले असले, तरी मुख्यमंत्र्यांसह शरद पवार, अशोक चव्हाण हे मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा मुद्दा लवकरच मार्गी लागणार असून, त्यासाठीचा फॉर्म्युला मी सरकारला देणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: "Bharatiya Janata Party showed black day to Marathas"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.