दाढी १०० रुपये, तर कटिंग १५० रुपये ! कोरोनाकाळात खर्च वाढला, दरही वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 01:26 AM2020-10-28T01:26:18+5:302020-10-28T01:26:35+5:30

Thane News : अनलॉकनंतर शहरातील केशकर्तनालये अटी आणि शर्तीने खुली झाली आहेत. परंतु, सामग्रीच्या दरात वाढ झाल्याने दाढीसाठी १०० रुपये तर, कटिंगसाठी १५० रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत. 

Beard 100 rupees, cutting 150 rupees! During the Corona period, costs increased, and so did prices | दाढी १०० रुपये, तर कटिंग १५० रुपये ! कोरोनाकाळात खर्च वाढला, दरही वाढले

दाढी १०० रुपये, तर कटिंग १५० रुपये ! कोरोनाकाळात खर्च वाढला, दरही वाढले

Next

- कुलदीप घायवट 

कल्याण - लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद राहिल्याने केशकर्तनालय व्यवसायाचे तीनतेरा वाजले. आता अनलॉकनंतर शहरातील केशकर्तनालये अटी आणि शर्तीने खुली झाली आहेत. परंतु, सामग्रीच्या दरात वाढ झाल्याने दाढीसाठी १०० रुपये तर, कटिंगसाठी १५० रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत. 
लॉकडाऊनमध्ये कोलमडलेल्या व्यवसायाला सध्या पुन्हा उभारी दिली जात आहे. यासाठी कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील १०० टक्के केशकर्तनालये खुली करण्यात आली आहेत. 

कटिंग आणि दाढीच्या दरांत वाढ झाली असली तरी, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नियम आणि अटींचे पालन करताना  या व्यवसायातील खर्चही  वाढला आहे.   

थर्मल स्क्रीनिंग तसेच सॅनिटायझरने हात धुऊन अनेक दुकानांत प्रवेश दिला जात आहे. लॉकडाऊनमध्ये केस कापण्यासाठी फोन येत होते. आम्ही स्वतःची काळजी घेत नेहमीच्या ग्राहकांचे केस घरी जाऊन कापले, अशी माहिती एका व्यावसायिकाने दिली. 

लॉकडाऊनदरम्यान राज्यभरात १७ व्यावसायिकांनी आत्महत्या केली. व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे. कोरोनाचे नियम पाळत असताना सुरक्षेच्या साधनांचा वापर वाढल्याने खर्चात वाढ झाली आहे.
 - अनिल पंडित, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतली जाते काळजी  

संसर्ग टाळण्यासाठी सलूनमध्ये सॅनिटायझर, सोडियम क्लोराइड, मास्क, डिस्पोजेबल कापड, टॉवेलचा वापर केला जातो. 
अपॉईंटमेंट घेऊनच ग्राहकाला बोलावले जाते. सेवेनंतर डिस्पोजेबल कापडाची तसेच मास्कची योग्य विल्हेवाट लावली जाते.  

व्यावसायिकांच्या खर्चात झाली वाढ   
केशकर्तनालयाच्या मालकाला पगारावर कारागीर मिळत नाहीत. दरडोई प्रत्येक सेवेसाठी ५० टक्के कामगार घेतात. २० टक्के खर्च करून मालकाला ३० टक्के मिळतात. दरवाढ असली तरी, खर्चही तेवढाच वाढला आहे. कटिंगसाठी वापरले जाणारे डिस्पोजेबल अ‍ॅप्रॉन, डिस्पोजेबल टॉवेलच्या किटची किंमत १५ रुपये आहे. स्वच्छतेसह मेंटेनन्स खर्च वाढला आहे. 

Web Title: Beard 100 rupees, cutting 150 rupees! During the Corona period, costs increased, and so did prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.