शिवसेना आमदाराच्याविरोधात शहरात बॅनरबाजी; रस्त्याच्या कामावरून स्थानिक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 11:29 PM2020-12-04T23:29:40+5:302020-12-04T23:29:51+5:30

अंबरनाथमध्ये बालाजी किणीकर यांच्याविरोधात केली बॅनरबाजी; पाहणी दौरा केला रद्द

Banner hoisting in the city against Shiv Sena MLA; Locals angry over road works | शिवसेना आमदाराच्याविरोधात शहरात बॅनरबाजी; रस्त्याच्या कामावरून स्थानिक संतप्त

शिवसेना आमदाराच्याविरोधात शहरात बॅनरबाजी; रस्त्याच्या कामावरून स्थानिक संतप्त

Next

अंबरनाथ : अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर रस्त्याचे काम संथगतीने चालल्याचा आरोप करत आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याविरोधात शुक्रवारी बॅनरबाजी करण्यात आली. गेल्या पाच वर्षांपासून हे काम अतिशय संथ सुरू असून याला आमदारांचा निष्क्रिय कारभार कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे अंबरनाथमधील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

राज्य महामार्गाचा दर्जा असलेल्या कल्याण- बदलापूर रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण एमएमआरडीएकडून केले जात आहे. सध्या रेशनिंग ऑफिस ते मोरिवलीनाक्यापर्यंतच्या पट्ट्यात हे काम सुरू आहे. मात्र, हे काम अतिशय कासवगतीने सुरू असून यामुळे स्थानिकांना त्रास होत असल्याचा आरोप केला जात आहे. याच रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मेटलनगर भागातील रिक्षाचालक लल्लन यादव हे जखमी झाले. यादव यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यामुळे त्यांच्यावर सध्या घरी बसण्याची वेळ आली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आमदार डॉ. किणीकर हे अधिकाऱ्यांसह रस्त्याची पाहणी करणार होते. मात्र, त्यापूर्वीच स्थानिकांनी ठिकठिकाणी आमदारांच्या निषेधाचे बॅनर लावत त्यांना काळे झेंडे दाखवायची तयारी केली. आमदारांच्या दौऱ्याची वेळ होताच आमदारांविरोधात घोषणाबाजीही सुरू झाली. काँग्रेस आणि स्वाभिमान संघटनेनेही स्थानिकांना पाठिंबा दिला.

या सगळ्याची माहिती मिळताच किणीकर यांनी रस्त्याचा पाहणी दौरा ऐनवेळी रद्द केला. तसेच एमएमआरडीए, अंबरनाथ नगरपालिका, महावितरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची बैठक सरकारी विश्रामगृहात बोलावली. बैठक सुरू असतानाच शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर हे कुणालाही न कळवता अचानक तिथे दाखल झाल्याने अनेकांना घाम फुटला. यानंतर अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत सर्व अडथळे पूर्ण करत कामाला गती देण्याचे आश्वासन आमदार किणीकर आणि शहरप्रमुख वाळेकर यांना दिले.दिरंगाई झाल्याचे केले मान्य आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना बॅनरबाजीबाबत विचारले असता रस्त्याला दिरंगाई झाल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
 

 

Web Title: Banner hoisting in the city against Shiv Sena MLA; Locals angry over road works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.