Awarded by senior painter Ashok Samel Gandhar Gaurav Award, the government should pay special attention to Balarangbhoomi: Samel | ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित, बालरंगभूमीकडे सरकारनेही विशेष लक्ष दिले पाहिजे : समेळ
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित, बालरंगभूमीकडे सरकारनेही विशेष लक्ष दिले पाहिजे : समेळ

ठळक मुद्देज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ गंधार गौरव पुरस्काराने सन्मानितबालरंगभूमीकडे सरकारनेही विशेष लक्ष दिले पाहिजे : समेळपत्की यांचाही सत्कार

ठाणे : गंधार कलासंस्थेच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा गंधार गौरव पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांना ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले. या पुरस्काराला उत्तर देताना समेळ म्हणाले की, अ. भा. मराठी नाट्यपरिषद आजही बालरंगभूमीकडे गांभीर्याने पाहत नाही. बालरंगभूमीकडे सरकारनेही विशेष लक्ष दिले पाहिजे. जोपर्यंत बालरंगभूमी सशक्त होणार नाही तोपर्यंत मराठी रंगभूमीला उत्तम दिवस येणार नाहीत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.  तसेच, यावेळी पत्की यांचाही सत्कार करण्यात आला. 
गुरूवारी बालदिनानिमित्त या सोहळ््याचे गडकरी रंगायतन येथे आयोजन केले होते. दरवर्षी बालरंगभूमीच्या विशेष योगदानाबद्दल एका ज्येष्ठ रंगकर्मींचा गंधार गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. याआधी रत्नाकर मतकरी, विद्याताई पटवर्धन आणि दिलीप प्रभावळकर यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. यावर्षी हा पुरस्कार समेळ यांना देण्यात आला. समेळ यावेळी पुढे म्हणाले की, मी बालनाटकातूनच मोठा होत गेलो. हा पुरस्कार माझ्यासाठी घरचा सत्कार आहे. बालरंगभूमी सशक्त झाल्यास आम्ही मराठी रंगभूमीचा पाहिलेला सुवर्णयोग पुन्हा येईल अशी आशा व्यक्त केली. ज्येष्ठ कवी अशोक बागवे म्हणाले की, ठाणे ही उपराजधानी नसून ती सांस्कृतिक राजधानीच आहे. हे श्रीस्थानक सर्व कलांचे स्थानक आहे. इथे सर्व कला एकत्र नांदतात असे ते म्हणाले. ठाणे ही कलावंताची राजधानी असली पाहिजे आणि याचा वटवृक्ष आम्ही करणार असल्याचे आश्वासन आ. निरंजन डावखरे यांनी यावेळी दिले. आ. केळकर म्हणाले की, समेळ यांचे रंगभूमीला मोठे योगदान आहे. ते नॉन स्टॉप काम करतात. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पाहिजे अशी आशा त्यांनी व्यक्त केली. केळकर पुढे म्हणाले, ठाणे ही महाराष्ट्राची राजधानीच आहे. कारण इथे एकही दिवस असा जात नाही की, कोणती कला सादर झाली नाही. पुढच्या काळात रंगभूमीला समृद्ध करण्यासाठी बालरंगभूमीला खतपाणी दिले पाहिजे तरच अधिक सुवर्ण काळ निर्माण होईल. दरम्यान, पत्की यांच्या झिंगल्ससवर गंधारच्या बालकलाकारांनी सादरीकरण करुन मान्यवरांबरोबर उपस्थितांची दाद मिळवली. प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी ज्येष्ठ क्रि केटर सुलक्षण कुलकर्णी, दिग्दर्शक विजू माने, अभिनेते सागर तळाशिकर, केबीपी महाविद्यालयाचे सचिन मोरे, गंधारचे प्रा. मंदार टिल्लू, बाळकृष्ण ओडेकर आदी उपस्थित होते. यावेळी बालरंगभूमीसाठी कार्यरत असणाऱ्या प्रेरणा या संस्थेला गौरविण्यात आले. या संस्थेच्या वतीने अशोक पावसकर, चित्रा पावसकर या दाम्पत्याला गौरविण्यात आले. तसेच, प्रकाश निमकर, राजेश उके या परिक्षकांचा, सूर नवा ध्यास नवा मध्ये चमकलेल्या सई जोशी या तिघांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
------------------------------
गंधारतर्फे निवडण्यात आलेल्या नाटकांना यावेळी गौरविण्यात आले.
े*सर्वोत्कृष्ट बालनाट्य
सेक्र ेड हार्टचे थिएटर आॅफ इनोव्हेशन-कल्याण-एक था टायगर

----------------------------------------------------------
*सर्वोत्कृष्ट नेपथ्य
माणिक खटिंग/ उमेश गोडसे-मॅडम-पुणे
----------------------------------------------------------
*सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना
एम. बी. एन्टरटेनमेंट-कल्याण-अल्लादीन आणि जादुई जीन-चेतन पडवळ

----------------------------------------------------------
*सर्वोत्कृष्ट रंगभूषा
सेक्र ेड हार्टचे थिएटर आॅफ इनोव्हेशन-कल्याण-एक था टायगर-अनिकेत काळोखे

----------------------------------------------------------
*सर्वोत्कृष्ट वेशभूषा
अश्वमेध नाट्यसंस्था-कल्याण-आदिंबाच्या बेटावर-रश्मी घुले आणि पालकवर्ग

----------------------------------------------------------
*सर्वोत्कृष्ट पाशर््वसंगीत
नाट्यसंस्कार कला अकादमी-पुणे-नाच रे मोरा-आनंद देशमुख

----------------------------------------------------------
*सर्वोत्कृष्ट लेखक
राजयोग-कल्याण-राखेतून उडाला मोर-डॉ. सतिश साळुंखे
---------------------------------------------------------
*सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
सेक्र ेड हार्टचे थिएटर आॅफ इनोव्हेशन-कल्याण-एक था टायगर-सुरेश शेलार
----------------------------------------------------------

*सर्वोत्कृष्ट बालकलाकार मुलगा
सेक्र ेड हार्टचे थिएटर आॅफ इनोव्हेशन-कल्याण-एक था टायगर-हर्ष काटे

----------------------------------------------------------
*सर्वोत्कृष्ट बालकलाकार मुलगी
सेक्र ेड हार्टचे थिएटर आॅफ इनोव्हेशन-कल्याण-एक था टायगर-अपुर्वा पडवळ

Web Title: Awarded by senior painter Ashok Samel Gandhar Gaurav Award, the government should pay special attention to Balarangbhoomi: Samel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.