नेते मंडळींकडून मराठा आणि बहुजनांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2020 11:31 PM2020-11-01T23:31:25+5:302020-11-01T23:34:48+5:30

मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने राज्यभर मराठा जोडो अभियान सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई येथून सुरू झालेल्या रॅलीची रविवारी ठाण्यातील माजीवडा पुलाच्या खाली सांगता झाली. मराठा आणि बहुजन समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न काही नेते मंडळी करीत असल्याचा आरोप मराठा क्र ांती मोर्चाच्या समन्वयकांनी यावेळी ठाण्यात केला.

Attempts by leaders to provoke quarrels between Marathas and Bahujans | नेते मंडळींकडून मराठा आणि बहुजनांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न

राज्यभर मराठा जोडो अभियान

Next
ठळक मुद्दे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा आरोप राज्यभर मराठा जोडो अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मराठा आणि बहुजन समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न काही नेते मंडळी करीत असल्याचा आरोप मराठा क्र ांती मोर्चाच्या समन्वयकांनी ठाण्यात केला. राजकीय नेत्यांमुळेच दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने राज्यभर मराठा जोडो अभियान सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई येथून सुरू झालेल्या रॅलीची रविवारी ठाण्यातील माजीवडा पुलाच्या खाली सांगता झाली.
मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने न्यायालयात योग्य भूमिका न बजावल्यामुळे आरक्षणाच्या बाबतीत निर्णय होऊ शकला नाही . या साठी सकल मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने मराठा जोडो अभियानाची सुरु वात रविवारपासून करण्यात आली आहे. मुंबईमधून सुरू झालेल्या या रॅलीची सांगता रविवारी ठाण्यात झाली. माजीवडा येथील उड्डाणपूलाच्या खाली मुंबईमधील क्र ांती मोर्चाच्या समन्वयकांचे स्वागत ठाण्यातील समन्वयकानी केले. या वेळी शिवाजी महराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मराठा आरक्षण लागू नसताना सरकारने जी नोकर भरती करण्याचे ठरवले आहे .ते चुकीचं आहे. ज्या राजकीय नेत्यांना त्यांच्याच समाजातही किंमत नाही, ते नेते मराठा आणि बहुजन समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातून दोन समाजात तेढ निर्माण होत आहे, असल्याचा आरोप मराठा मोर्चाचे मुंबई समन्वयक रवींद्र पवार यांनी केला.
या वेळी सरकारमधील मंत्री आणि सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. भविष्यात समन्वयकांची दुसरी टीम मुंबईहून दहिसरच्या दिशेने तर इतर टीम कल्याणच्या बाजूने जाईल आणि जनजागृती करण्यात येईल, असे मोर्चाचे पवार यांनी सांगितले.

Web Title: Attempts by leaders to provoke quarrels between Marathas and Bahujans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.