Hiran Mansukh:ATS:हिरन मनसुख मृत्युप्रकरणी एटीएसने दाखल केला खूनाचा गुन्हा

By जितेंद्र कालेकर | Published: March 7, 2021 07:15 PM2021-03-07T19:15:25+5:302021-03-08T11:07:42+5:30

आपल्या पतीची हत्या झाल्याचा संशय मनसुख यांची पत्नी विमला यांनी मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे रविवारी चौकशी दरम्यान केला. त्यानंतर याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ATS files murder case after Vimala Mansukh's complaint | Hiran Mansukh:ATS:हिरन मनसुख मृत्युप्रकरणी एटीएसने दाखल केला खूनाचा गुन्हा

Hiran Mansukh:ATS:हिरन मनसुख मृत्युप्रकरणी एटीएसने दाखल केला खूनाचा गुन्हा

Next
ठळक मुद्दे मनसुख हिरण मृत्यु प्रकरणाला कलाटणीठाण्यातील निवासस्थानापासून एटीएसची तपासाला सुरुवात मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी केली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीपाशी स्फोटके ठेवण्याकरिता वापरलेल्या मोटारकारच्या मालकाचा शुक्रवारी गूढ मृत्यु झाल्याचे आढळले. दरम्यान, आपल्या पतीची हत्या झाल्याचा संशय मनसुख यांची पत्नी विमला यांनी मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे रविवारी चौकशी दरम्यान केला. त्यानंतर याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हिरन यांच्या मृत्युचा मुंबई दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) तपास करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी
शुक्र वारी केली. त्यापाठोपाठ या घटनेच्या तपासासाठी शुक्र वारपासूनच एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सुरु वात केली. शनिवारी तसेच रविवारीही या अधिकाऱ्यांनी मनसुख यांच्या ठाण्यातील ‘विकास पाम’ या इमारतीमधील त्यांच्या कुटूंबियांकडे चौकशी केली. पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या पथकाने सुमारे साडे तीन तास केलेल्या चौकशीमध्ये मनसुख यांची पत्नी विमला तसेच मोठा मुलगा मित यांच्यासह कुटूंबियांनी मनसुख यांच्या मृत्युबद्दल संशय व्यक्त करीत खूनाचा आरोप केला. त्यांची गाडी चोरीला गेल्यानंतरही त्यांनी एटीएसला संपूर्णपणे सहकार्य केले होते. मग, तरीही रात्री ८ वाजता त्यांना आलेला फोन कॉल कोणाचा होता? त्यानंतर ते तावडे साहेबांचे नाव सांगत ठाण्यातील घोडबंदर रोडला कोणाकडे गेले? रात्री १० नंतर त्यांचा फोन बंद आला. पुढे दुसºया दिवशी त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत मिळाला. हे संपूर्ण प्रकरणच संशयास्पद असून चांगले स्वीमर असलेले मनसुख हे आत्महत्या करुच शकत नाही, असा दावा करीत या कुटूंबियांनी याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करुन अखेर पत्नी विमला यांच्या तक्रारीच्या आधारे याप्रकरणी खून आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दहशतवादविरोधी पथक, मुंबई येथे दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या प्रकरणाशी निगडीत सर्व कागदपत्रेही एटीएसच्या अधिकाºयांनी रविवारी मुंब्रा पोलिसांकडून ताब्यात घेतल्याचेही एटीएसच्या एका अधिकाºयाने सांगितले.
* मास्कच्या आत रुमाल मिळाल्यानेही गूढ वाढले
मुंब्रा रेतीबंदर येथील खाडीतून मनसुख यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, त्यावेळी त्यांच्या तोंडाला असलेल्या मास्कच्या आत काही रु माल मिळाले. हा मृतदेह पूर्णपणे चिखलाने भरलेला होता. रु माल मात्र मास्कच्या आत असल्यामुळे ते चांगल्या स्थितीत होते. हे रु माल मनसुख यांच्या तोंडाला कोणी लावले? ते त्यांनी स्वत: लावले की अन्य कोणी? यावरु न अनेक तर्क वितर्ककेले जात आहेत.

Web Title: ATS files murder case after Vimala Mansukh's complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.