मसण्या उदमांजर बाळगणाऱ्यास अटक : ठाण्यातील येऊर येथील घरातून केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:09 PM2019-08-18T23:09:13+5:302019-08-18T23:41:43+5:30

वन्यजीव अनुसूची दोन नुसार संरक्षित बनातून मसण्या उदमांजर पकडून ते बंदिस्त ठेवणा-या महेंद्र फुफाणे याच्यावर ठाणे वन विभागाने रविवारी सायंकाळी कारवाई केली आहे. त्याच्या ताब्यातून या मसण्या उदमांजराची सुटकाही करण्यात आली आहे.

 Arrested for spying: release from house of Auer in Thane | मसण्या उदमांजर बाळगणाऱ्यास अटक : ठाण्यातील येऊर येथील घरातून केली सुटका

ठाणे वनविभागाची कारवाई

Next
ठळक मुद्देठाणे वनविभागाची कारवाई महेंद्र फुफाणे याला घेतले ताब्यात १९७२ अन्वये वनगुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बेकायदेशीरपणे मसण्या उदमांजर बाळगणा-या महेंद्र फुफाणे यास ठाणे वनविभागाने रविवारी अटक केली. त्याच्याकडून हे मांजरही ताब्यात घेतले आहे.
बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून मसण्या उदमांजर पकडून आपल्या घरामध्ये फुफाणे याने बंदिस्त करून ठेवल्याची माहिती ठाणे वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार, परिमंडळ वनअधिकारी सुजय कोळी, विकास कदम, रमाकांत मोरे, अमित राणे आणि राजन खरात आदींच्या पथकाने १८ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास फुफाणे याच्या येऊर येथील घरातून त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्या ताब्यातून मसण्या उदमांजराची सुटका केली. त्याच्याविरुद्ध राष्ट्रीय उद्यानामध्ये विनापरवानगी प्रवेश करणे, वन्यजीव पकडणे आणि ते त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून पकडून घरात बंदिस्त ठेवणे आदी कलमांखाली वनगुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
----------

Web Title:  Arrested for spying: release from house of Auer in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.