पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणारा जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 12:06 AM2021-06-14T00:06:49+5:302021-06-14T00:10:43+5:30

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध सोशल मिडियाद्वारे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या मयुर उर्फ मयुरेश मुरलीधर कोटकर (३७, रा. बाळकूम पाडा, ठाणे) याला श्रीनगर पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली.

Arrested for posting offensive post against Guardian Minister Eknath Shinde | पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणारा जेरबंद

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणारा जेरबंद

googlenewsNext
ठळक मुद्दे श्रीनगर पोलिसांची कारवाईशिवसेना नगरसेवकाची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध सोशल मिडियाद्वारे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या मयुर उर्फ मयुरेश मुरलीधर कोटकर (३७, रा. बाळकूम पाडा, ठाणे) याला श्रीनगर पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. शिवसेना नगरसेवक योगेश जानकर यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
मयुरेश कोटकर याने पालकमंत्री शिंदे यांच्या संदर्भात सोशल मिडिया तसेच फेसबुकवर दोन जाती, समाजामध्ये शत्रुत्व, भेदभाव, दुष्टावा निर्माण करणारी तसेच वाढविणारी पोस्ट केली होती. हा प्रकार १२ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला होताा. थेट पालकमंत्र्यांची अब्रुनकुसान करणे तसेच दोन समाजामध्ये भेदभाव निर्माण करुन एखादा अपराध करण्यासाठी चिथावणी देण्याचा हा प्रकार होता. याची दखल घेत शिवसेनेचे किसननगर येथील नगरसेवक योगेश जानकर यांनी याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात १२ जून रोजी कलम ५०० तसेच ५०५ नुसार गुसार गुन्हा दाखल केला होता. ही तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. एस. कुलकर्णी यांच्या पथकाने मयुरेश याला रविवारी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Arrested for posting offensive post against Guardian Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.