लोकलमधील चोरीच्या घटनांवर ‘स्क्रीप्स’ची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:54 AM2020-02-17T00:54:52+5:302020-02-17T00:55:09+5:30

कडक अंमलबजावणी : पोलिसांच्या वॉचमुळे गुन्ह्यांचे प्रमाण ८५५ ने घटले

The amount of 'scrips' on local theft incidents | लोकलमधील चोरीच्या घटनांवर ‘स्क्रीप्स’ची मात्रा

लोकलमधील चोरीच्या घटनांवर ‘स्क्रीप्स’ची मात्रा

Next

पंकज रोडेकर 

ठाणे : लोकल प्रवासात चोरीच्या घटनांची सुसाट ट्रेनच ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत धावत होती. मात्र, तिला आता चांगलाच ब्रेक लागल्याचे दिसत आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मधील घटनांचे प्रमाण हे ८५५ ने कमी झाले आहे. हे प्रमाण प्रभावीपणे रोखण्यात पुणेरी पॅटर्नच्या ‘स्क्रीप्स’ योजनेची मात्रा कामी आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये मोबाइल चोरीप्रकरणी तीन हजार ४६० गुन्ह्यांची नोंद झाली होती. तत्पूर्वी २०१६ साली ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अवघे ३८८ गुन्हे नोंदवले गेले होते. मात्र, २०१७ पासून गुन्ह्णांचे प्रमाण वाढल्याने २०१८ मध्ये हा आकडा चार हजार ७९६ वर पोहोचला. याचदरम्यान, मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त म्हणून रवींद्र शेनगावकर यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी पुण्यात असताना चोरट्यांवर वचक निर्माण होण्यासाठी ‘स्क्रीप्स’ ही योजना राबवली होती. ती योजना प्रभावी ठरल्याने त्यांनी तिची अंमलबजावणी मुंबई लोहमार्ग आयुक्तालयात प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत या योजनेची प्रभावी मात्रा ठरल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळे गुन्ह्यांची संख्या ८५५ ने कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. गुन्हे कमी झाले असले तरी, गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण हे त्या तुलनेत वाढलेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

काय आहे योजना...
स्क्रीप्स योजनेत प्रत्येक पोलीस ठाण्यात एक विशेष पथक तयार केले आहे. या पथकामार्फत दररोज रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी जाऊन तो नेमका तेथेच राहतो की, तो तेथून दुसरीकडे राहण्यास गेला आहे, याच्यासह तो नेमके काय करतो, याची इत्थंभूत माहिती घेतली जाते. त्यानुसार, त्या गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यावर वॉच ठेवला जातो.

मिसिंग एण्ट्री बंद
च्लोकल प्रवासात बॅग हरवली. यापूर्वी मिसिंगची एण्ट्री ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात घेतली जात होती. मात्र, त्या एण्ट्रीसाठी ठेवलेली वहीच आता काढून टाकल्याने त्याऐवजी थेट गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गुन्ह्यांचा तक्ता
सन गुन्हे उघड
२०१५ ६१२ २७९
२०१६ ३८८ २२८
२०१७ ३४६० ३९२
२०१८ ४७९६ ४९४
२०१९ ३९४१ ४८५

Web Title: The amount of 'scrips' on local theft incidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.