अवघ्या २४ तासांमध्ये ४८ तळीरामांविरुद्ध वाहतूक शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 08:22 PM2021-03-29T20:22:20+5:302021-03-29T20:25:00+5:30

बहुसंख्य रस्ते अपघात हे मद्यपी वाहन चालकांमुळे होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून अशा वाहनचालकांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली जाते. होळी आणि धुळवडीचा सण साजरा करण्याच्या नावाखाली अनेकजण मद्य प्राशन करुन वाहन चालवितात. याच पार्श्वभूमीवर मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ नुसार मद्यपी वाहनचालक आणि कलम १८८ अन्वये सहप्रवाशांवरही कारवाई केली जाते.

Action of Transport Branch against 48 Talirams in just 24 hours | अवघ्या २४ तासांमध्ये ४८ तळीरामांविरुद्ध वाहतूक शाखेची कारवाई

एक हजार १८२ विना हेल्मेट चालकांवर बडगा

Next
ठळक मुद्दे एक हजार १८२ विना हेल्मेट चालकांवर बडगाअंबरनाथ विभागाअंतर्गत सर्वाधिक १३ मद्यपी वाहन चालकासह १६ सहप्रवाशांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: होळी आणि धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ४८ तळीरामांविरुद्ध तसेच ३१ सहप्रवाशांवरही ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाई केली आहे. त्याचबरोबर एक हजार १८२ विना हेल्मेट मोटारसायकल चालविणाऱ्यांवरही कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
बहुसंख्य रस्ते अपघात हे मद्यपी वाहन चालकांमुळे होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून अशा वाहनचालकांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली जाते. होळी आणि धुळवडीचा सण साजरा करण्याच्या नावाखाली अनेकजण मद्य प्राशन करुन वाहन चालवितात. याच पार्श्वभूमीवर मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ नुसार मद्यपी वाहनचालक आणि कलम १८८ अन्वये सहप्रवाशांवरही कारवाई केली जाते. ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या १८ विभागांतर्गत २८ मार्च रोजी रात्री आणि २९ मार्च रोजी दिवसभर विविध ठिकाणी नाकाबंदी केली होती. त्यात २८ मार्च रोजी दोन तर २९ मार्च रोजी ४६ अशा ४८ मद्यपी वाहन चालकांना पकडण्यात आले. त्याचवेळी सोमवारी मद्यपींसमवेत वाहनांमध्ये असलेल्या ३१ सह प्रवाशांवरही कारवाई झाली. यामध्ये अंबरनाथ विभागाअंतर्गत सर्वाधिक १३ मद्यपी वाहन चालकासह १६ सहप्रवाशांवर कारवाई झाली आहे. रविवारी विनाहेल्मेट वाहन चालविणारे २७७ आणि सोमवारी ९०५ अशा एक हजार १८२ जणांवर कारवाई करण्यात आली. तर मोटारसायकलीवरुन ट्रीपल सीट जाणाºया ९८ जणांविरुद्ध कारवाई केल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली. विशेष म्हणजे या कारवाई सोबतच कर्कश आवाजात मोटारसायकली वाहन चालविणाºयांवरही कारवाईचा बडगा उगारल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Action of Transport Branch against 48 Talirams in just 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.