कल्याण पूर्वेतील आदिवली व ढोकली येथे ५२ वीज चोरांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 06:08 PM2020-10-28T18:08:25+5:302020-10-28T18:08:32+5:30

बिल्डरकडून बनावट मीटरद्वारे सदनिकाधारकांना वीज 

Action against 52 power thieves at Adivali and Dhokli in Kalyan East | कल्याण पूर्वेतील आदिवली व ढोकली येथे ५२ वीज चोरांविरुद्ध कारवाई

कल्याण पूर्वेतील आदिवली व ढोकली येथे ५२ वीज चोरांविरुद्ध कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
डोंबिवली: महावितरणच्या कल्याण पूर्व विभागातील उपविभाग एक अंतर्गत मंगळवार व बुधवारी ५२ वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. तेथील दोन सोसायट्यांमधील दहा इमारतींमध्ये झालेल्या कारवाईत बिल्डरकडून बनावट मीटरद्वारे तसेच कांही ठिकाणी मीटरशिवाय सदनिकाधारकांना थेट वीजपुरवठा केल्याचे आढळून आले.

कल्याण पूर्व उपविभाग एकचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती यांच्या नेतृत्वाखाली त्या इमारतींच्या ३६० सदनिकांच्या वीज पुरवठ्याची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५२ वीज चोरट्यांनी जवळपास ८ लाख २० हजार किंमतीची ८२ हजार युनिट वीज चोरून वापरल्याचे निष्पन्न झाले. चोरून वापरलेल्या विजेचे देयक दंडासह भरण्याच्या नोटीसा संबंधितांना देण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार देयक व दंडाचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी फिर्याद देण्यात येईल.

या कारवाईत बिल्डरच्या माध्यमातून बनावट मीटरद्वारे पाच ठिकणी तर इतर ठिकाणी विजेचा थेट चोरटा वापर आढळून आला. वीज चोरांविरुद्धची मोहीम नियमितपणे सुरु राहणार असून कारवाई टाळण्यासाठी अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. तांत्रिक या अतांत्रिक कर्मचाऱ्यांच्या १५ जणांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

Web Title: Action against 52 power thieves at Adivali and Dhokli in Kalyan East

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.