अंधेरीतून ३७ हजारांच्या  बनावट नोटा हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 05:39 AM2020-11-23T05:39:28+5:302020-11-23T05:39:52+5:30

ठाणे खंडणीविरोधी पथकाची कारवाई : चौघांच्याही पोलीस कोठडीत वाढ

37,000 counterfeit notes seized from Andheri | अंधेरीतून ३७ हजारांच्या  बनावट नोटा हस्तगत

अंधेरीतून ३७ हजारांच्या  बनावट नोटा हस्तगत

Next

ठाणे : कर्ज फेडण्यासाठी मुंब्य्रातील घरातच भारतीय बनावटीच्या चलनी नोटा छापून त्या वठविणाऱ्या मुजमिल मोहंमद साल्हे सुर्वे (४०, रा. मुंब्रा) याच्यासह चौघांकडून आणखी ३७ हजार ७०० रुपयांच्या बनावट नोटा ठाणे खंडणीविरोधी पथकाने जप्त केल्या आहेत. आतापर्यंत त्याच्याकडून ११ लाख ८६ हजार ७०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

मुंब्रा रेल्वेस्थानक परिसरातील दत्त पेट्रोलपंपाजवळ बनावट नोटा वठविण्यासाठी आलेल्या सुर्वे याच्यासह मुजफ्फर शौकत पावसकर (४१), प्रवीण परमार (४३) आणि नसरीन काझी (४१) या चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने २००, ५०० आणि दोन हजारांच्या नवीन बनावट नोटांसह १८ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. सहायक पोलीस आयुक्त निवृत्ती कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, उपनिरीक्षक रमेश कदम, पोलीस अंमलदार संजय भिवणकर, सत्यवान सोनवणे आदींच्या पथकाने ही कारवाई केली होती. त्यांना २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते. चौकशीमध्ये या पथकाने पावसकर याच्या मुंबईतील अंधेरी, मरोळनाका येथील घरातून १०० आणि २०० रुपयांच्या ३७ हजार ७०० रुपयांच्या आणखी बनावट नोटा २० नोव्हेंबर रोजी हस्तगत केल्या आहेत. नोटांच्या छपाईसाठी उपयोगात आणलेला स्कॅनर तसेच एका नामांकित कंपनीचा बॉण्डपेपरही त्यांच्याकडून जप्त केला आहे. चौघांपैकीच एकाने या नोटांपैकी ४५ हजार रुपये चलनात वठविले आहेत. त्याने एकाकडे दूधखरेदी केली होती. तो साक्षीदार पोलिसांच्या हाती लागला आहे.

आणखी दोन आरोपींचा कसून शोध सुरु  
n ज्यांनी या बनावट नोटा घेतल्या, ते आणखी दोन आरोपीही यात निष्पन्न झाले आहेत. त्यांचाही शोध घेण्यात येत आहे. 
n त्यांनी १० हजारांमध्ये ४० हजारांच्या १०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा विकत घेतल्या होत्या, अशीही माहिती तपासामध्ये समोर आली आहे. 
n या चौघांनाही २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने शनिवारी दिले आहेत.

Web Title: 37,000 counterfeit notes seized from Andheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.