ठाणे जिल्ह्यात ३३३ रुग्ण शनिवारी आढळले; सात जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 08:33 PM2021-01-02T20:33:04+5:302021-01-02T20:33:48+5:30

उल्हासनगरला २० रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. आता या शहरात ११ हजार ३७४ बाधीत असून मृत्यू संख्या ३६१ आहे. भिवंडीला चार रुग्ण सापडला असून एकही मृत्यू नाही.

333 patients found in Thane district on Saturday; Seven people died | ठाणे जिल्ह्यात ३३३ रुग्ण शनिवारी आढळले; सात जणांचा मृत्यू 

ठाणे जिल्ह्यात ३३३ रुग्ण शनिवारी आढळले; सात जणांचा मृत्यू 

googlenewsNext

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ३३३ रुग्ण शनिवारी आढळून आले असून सात जण दगावले आहेत. आता जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या दोन लाख ४३ हजार ८७१ झाली असून पाच हजार ९७४ मृतांची संख्या आहे. ठाणे शहरात १०३ रुग्ण सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ५५ हजार ६४८ रुग्ण नोंदले असून आज एकही मृत्यू नाही. त्यामुळे मृतांची संख्या एक हजार ३१० कायम आहे. कल्याण - डोंबिवलीत ८५ रुग्ण आढळून आले असून दोघांचा मृत्यू आहे. या शहरात आता ५७ हजार ६५० बाधीत असून एक हजार १०६ मृत्यू झाले आहेत.
        
उल्हासनगरला २० रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. आता या शहरात ११ हजार ३७४ बाधीत असून मृत्यू संख्या ३६१ आहे. भिवंडीला चार रुग्ण सापडला असून एकही मृत्यू नाही. येथे सहा हजार ६११ बाधितांची तर, ३५२ मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदरला २४ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता २५ हजार ४६९ बाधितांसह ७८३ मृतांची संख्या आहे. अंबरनाथ शहरात सात रुग्ण सापडले आहे. तर, दोन मृत्यू आहे. या शहरात आता आठ हजार २६२ बाधितांसह मृतांची संख्या ३०५ नोंदवण्यात आली. बदलापूरला १३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण आठ हजार ९०२ असून एकही मृत्यू नसल्याने मृत्यूची संख्या ११९ आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात ११ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या गांवपाड्यांत १८ हजार ७८७ बाधीत झाले असून ५८१ जणांचा मृत्यू झालेला आहे.
 

Web Title: 333 patients found in Thane district on Saturday; Seven people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.