३२ हजार चालक ‘वन-वे’वर सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:55 AM2021-02-25T04:55:33+5:302021-02-25T04:55:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : अपघात रोखण्यासाठी, तसेच वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी ठाणे शहरात वाहतूक पोलिसांनी एकदिशा अर्थात वन-वे ...

32,000 drivers on one-way | ३२ हजार चालक ‘वन-वे’वर सुसाट

३२ हजार चालक ‘वन-वे’वर सुसाट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : अपघात रोखण्यासाठी, तसेच वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी ठाणे शहरात वाहतूक पोलिसांनी एकदिशा अर्थात वन-वे मार्गावर कडक निर्बंध केले आहेत. गेल्या वर्षभरात संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात वन-वेमध्ये बिनधास्तपणे शिरणाऱ्या ३१ हजार ७८२ चालकांकडून ६३ लाख ५६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे शहरात नागरिकांच्या मागणीनुसार, तसेच वाहतूककोंडी लक्षात घेऊन वाहतूक नियंत्रण शाखेने दहा ठिकाणी एकदिशा मार्ग निश्चित केले आहेत. यामध्ये कोर्टनाका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते ए वन फर्निचरपर्यंत, खोपट एसटी वर्कशॉप येथून जोंधळे बाग मार्ग, तसेच नौपाड्यातील गजानन महाराज चौकातून तीन पेट्रोल पंपाकडे, वीर सावरकर पथ तसेच ठाणे-मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाच्या बाजूला असलेला एलआयसी कार्यालय ते तीनहात नाका हा सेवा रस्ताही एकदिशा केला आहे.

*वन-वेवर मोठा दंड वसूल

एक दिशा मार्गावरून एखादे वाहन विरुद्ध दिशेने आल्यास अपघात होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळेच अशा मार्गांवर प्रत्येकी दोन कर्मचारी नेमले आहेत. गेल्या वर्षभरात एकदिशा मार्गावरून येणाऱ्या ३१ हजार ७८२ वाहनचालकांकडून ६३ लाख ५६ हजार ४०० इतका दंड वसूल केला आहे. अशा मार्गांवर केवळ फलक लावूनच नव्हे, तर ठोस कारवाई करणे हाच यावर उपाय असल्याचे ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

* वाहतूक नियमांना खो

वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी शहरातील महत्त्वाचे मार्ग एकदिशा केले आहेत. असे असले तरी लोकमान्य उद्यान गावदेवी, ठाणे या बाजूकडे जाणारा रस्ताही एकदिशा आहे. मात्र, या मार्गावर सर्रास नियमांना खो देत अनेक दुचाकी आणि रिक्षाचालक उलट दिशेने येताना पाहायला मिळतात.

* वाहतूक पोलिसांचा खडा पहारा

तीनहात नाका ते हायवे दर्शन सोसायटी, एलआयसी सर्कल-आरटीओ कार्यालय हा सेवा रस्ता एकदिशा असून या ठिकाणी एका महिला कर्मचाऱ्यासह एक वाहतूक वॉर्डन असे दोन कर्मचारी नियम तोडणाऱ्यांवर निगराणी ठेवण्यासाठी नेमले आहेत.

* रस्त्यावरच होते पार्किग

डॉ. मूस चौकाकडून जनता फॅशन कॉर्नर मार्ग- जांभळीनाका येथून सुभाष पथ रोड हा एकदिशा आहे. तरीही या मार्गावर अनेक ठिकाणी दुचाकीस्वारांनी आपली वाहने उभी केल्याचे आढळले.

...................................

फोटो २४ ठाणे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील

२४ ठाणे वनवे खडा पहारा

२४ ठाणे नियमांना खो

Web Title: 32,000 drivers on one-way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.